![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आता ब्लड टेस्टची गरज नाही, फक्त फुग्यात हवा भरा! डायबिटीज आहे की, नाही झटपट कळणार!
New Device For Detect Diabetes: तुम्हाला मधुमेह आहे, हे कसं समजतं, तर त्यासाठी रक्त तपासणी केली जाते. रक्त्तातील ग्लुकोजची पातळी मोजली जाते. आयआयटी मंडीनं यावर एक तोडगा शोधून काढला आहे.
![आता ब्लड टेस्टची गरज नाही, फक्त फुग्यात हवा भरा! डायबिटीज आहे की, नाही झटपट कळणार! IIT Mandi Students Invent New Device Detect Diabetes which can detect diabetes through breath health care tips in Mumbai News आता ब्लड टेस्टची गरज नाही, फक्त फुग्यात हवा भरा! डायबिटीज आहे की, नाही झटपट कळणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/06/a91c8dac94c99f4c0c2452e2fe082226170969591567788_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IIT Students Invent New Device Detect Diabetes: आज भारतातील अनेकांना मधुमेहानं (Diabetes) ग्रासलं आहे. अजून मधुमेहावर ठोस असे उपचार (Treatment For Diabetes) आलेले नाहीत. एकदा का तुम्हाला हा आजार जडला की, पुढे आयुष्यभर तो तुमची पाठ सोडत नाही. मधुमेह (Symptoms of Diabetes) सामान्य वाटत असला तरी त्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोज (Blood Glucose) (साखर)चं प्रमाण जास्त असतं. जेव्हा शरीर इंसुलिन तयार करू शकत नाही किंवा इन्सुलिन (Insulin) वापरू शकत नाही, तेव्हा असं होतं. इन्सुलिन हा एक हार्मोन (Hormones) आहे, जो शरीराला ऊर्जेसाठी ग्लुकोज वापरण्यास मदत करतो. मधुमेहामुळे हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे आजार, अंधत्व त्याप्रमाणे मनक्याचेही आजार उद्भवू शकतात.
तुम्हाला मधुमेह आहे, हे कसं समजतं, तर त्यासाठी रक्त तपासणी केली जाते. रक्त्तातील ग्लुकोजची पातळी मोजली जाते. दरम्यान, आयआयटी मंडीनं यावर एक तोडगा शोधून काढला आहे. आता मुधमेहाचं निदान करण्यासाठी रक्त तपासणीची गरज भासणार नाही. मधुमेहाची तपासणी करण्यासाठी तुम्हाला फक्त एका फुग्यात हवा भरावी लागणार आहे. त्याद्वारे तुम्ही मधुमेही आहात की, नाही याचा उलगडा होणार आहे. एवढंच नाही तर हे उपकरण हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण ओळखू शकतं.
कसं काम करतं हे डिव्हाइस?
एका हिंदी वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटी मंडीमधील संशोधकांनी एआय (Artificial Technology) नॉन-इन्वेसिव ग्लूकोमीटर नावाचं डिव्हाइस तयार केलं आहे. हे डिव्हाइस आजाराचं निदान करतं. ज्यांना मधुमेह झाल्याची शंका आहे, अशा व्यक्ती एका फुग्यात हवा भरून तो फुगा डिव्हाइसवर तपासणीसाठी ठेवला जातो. त्यानंतर रुग्णाच्या शरीरातील साखरेची पातळी समजते आणि त्यावरुनच तो रुग्ण मधुमेही आहे की, नाही हे ठरवलं जातं. या नव्या डिव्हाइसमध्ये 8 सेंसर लावण्यात आले आहेत. हे सेन्सर्स रुग्णांच्या श्वासातील बोलेटाइल ऑर्गेनिक कंपाउंडचा शोध घेऊन डायबिटीज आहे की नाही, हे ओळखतात.
550 रुग्णांची चाचणी
आयआयटीच्या या उपकरणाची नुकतीच बिलासपूर येथील एम्समधील 550 रुग्णांवर चाचणी करण्यात आली. यंत्रानं श्वासोच्छवासाचे नमुने आणि रुग्णांचा डेटा गोळा केला, ज्यामुळे चांगले परिणाम मिळाले. संशोधकांच्या मते, हे उपकरण 98 टक्के प्रभावी ठरलं आहे. हे उपकरण आरोग्य क्षेत्रात प्रभावी ठरेल, असं प्रकल्प प्रमुख डॉ.वरुण दत्त यांनी सांगितलं. ते म्हणाले की, हे उपकरण सहज कुठेही नेलं जाऊ शकतं आणि भविष्यात ते चांगले परिणाम देईल.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :
Male Sweat Attracts Womens : महिलांना आकर्षित करतो पुरूषांचा घाम; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)