Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
सिडनी कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह मैदानावर नसल्यामुळे विराट कोहली संघाचे नेतृत्व करताना दिसला.
Australia vs India 5th Test : सिडनी कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह मैदानावर नसल्यामुळे विराट कोहली संघाचे नेतृत्व करताना दिसला. दरम्यान, कोहलीने असे काही केले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला संपूर्ण जगासमोर लाज वाटावी लागली. सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी गेल्या सामन्यात विराट कोहलीला हूटिंग केले होते, ज्याला त्याने आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत सर्वांना गप्प केले होते. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यानंतर सँड पेपर घटनेची आठवण करून दिली.
खरंतर, विराट कोहली मैदानावर सँडपेपरच्या घडनेची नक्कल करून ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची छेड काढताना दिसला, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कोहली आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक एकमेकांवर सतत स्लेजिंग करताना दिसतात. अशा परिस्थितीत यावेळी कोहलीने सँडपेपर ॲक्ट करून ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची (Virat Kohli vs Australian Fans) खिल्ली उडवली.
स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यानंतर विराट स्टेडियममधील प्रेक्षकांसोबत जुगलबंदी करताना दिसला. त्यानंतर विराटने सँडपेपरच्या कृतीची नक्कल करत प्रतिक्रिया दिली. 2018 मधील ही घटना ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील एक वाईट घटना आहे, जे कोहलीही करताना दिसला. कोहलीने खिसे रिकामे करूनही दाखवले की, त्याच्या खिशात सँडपेपर नाही आणि आम्ही अशा गोष्टी करत नसल्याचे त्याने हावभाव करत सांगितले. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
"What is that about?"#AUSvIND pic.twitter.com/HwNZXhKW1S
— cricket.com.au (@cricketcomau) January 5, 2025
2018 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सँडपेपरचा वापर केला होता, जेणेकरून त्यांना रिव्हर्स स्विंगसाठी मदत होईल. मात्र, त्याची कृती कॅमेऱ्यात कैद झाली, त्यामुळे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाने जिंकली सिडनी कसोटी
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला आहे. भारतीय संघाने कांगारूंना 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावून लक्ष्य गाठले. या पराभवासह भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकाही गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-१ ने जिंकली. यासोबतच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतूनही बाहेर आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली असून दक्षिण आफ्रिकेने आधीच पात्रता मिळवली आहे. जूनमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डब्ल्यूटीसीचा विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.
हे ही वाचा -