Kidney Problems : किडनीचं आरोग्य जपायचंय? 'या' सवयी बदला; समस्यांपासून होईल सुटका
Protect Kidney from Damage : मूत्रपिंड (Kidney) हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. किडनीचं आरोग्य जपणं फार आवश्यक आहे, अन्यथा धोकादायक आजारांना बळी पडण्याची शक्यत असते.

How To Keep Your Kidney Healthy : निरोगी आरोग्यासाठी (Healthy Lifestyle) शरीरातील अवयवांची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. यांचं संतुलन आणि आरोग्य बिघडल्यास अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतो. त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाची काळजी घेणं आणि आरोगय जपणं गरजेचं आहे. मूत्रपिंड (Kidney) म्हणजेच किडनी हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. किडनी शरीर स्वच्छ ठेवण्याचं काम करते. किडनी फिल्टर प्रमाणे काम करते. किडनीमुळे शरीरातील टाकाऊ वस्तू शरीराबाहेर टाकणे शक्य होते. शरीरात विषद्रव्ये राहिल्यास तर अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. यामुळेच किडनी निरोगी ठेवणे फार आवश्यक आहे.
तुम्हाला किडनीचं आरोग्य जपायचं असेल आणि तुमची किडनी खराब होण्यापासून वाचवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे दैनंदिन दिनचर्येमध्ये बदल करावे लागतील. हे बदल कोणते जाणून घ्या.
किडनीच्या आजाराचा धोका कसा ओळखावा?
किडनीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असल्यास शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे वेळीच ओळखणं फार गरजेच आहे. यामुळे तुम्हाला योग्य वेळी उपाय करून समस्या दूर करता येते.
किडनीच्या आजारीची लक्षणे कशी ओळखावी?
- त्वचा पांढरी होते.
- त्वचा खूप कोरडी होते.
- नखे पांढरी होतात.
- नखे कमकुवत होऊ लागतात.
- शरीरावर खाज सुटते आणि स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.
किडनीचे नुकसान कसे टाळावे? (How to Protect Kidney from Damage)
पुरेशी झोप घेणं गरजेचं (Get enough Sleep)
किडनीचं आरोग्य सुधारायचं असेल, तर पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा आणि त्यात फारसा बदल करू नका. दररोज सात ते आत तासांची झोप घ्या, असे केल्याने किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
वजन नियंत्रण करणे (Weight Control)
वाढलेले वजन किडनीच्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. वाढलेल्या वजनामुळे मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब होतो यांसारखे आजार होता. त्यामुळे किडनीचेही खूप नुकसान होते. झोपेचाही वजनावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात झोप घ्या.
शरीराची हालचाल करा (Do Excercise)
निरोगी किडनीसाठी शरीराची हालचाल करणे फार आवश्यक आहे. दिवसातून अर्धा तास व्यायाम किंवा इतर कोणतीही शारीरिक क्रिया करणं फार गरजेचं आहे. शारीरिक हालचाल केल्यामुळे रक्तदाब अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहतो आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Milk Side Effects : काय सांगता? दूध पिण्याचे फायदेच नाही तोटेही; काय आहे भानगड? वाचा सविस्तर...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
