Health Tips : तणावमुक्त आयुष्य हवंय? या पाच गोष्टींचा काळजी घ्या...
Tips for Tension Free Life : जर तुम्ही दैनंदिन जीवनात तणावग्रस्त असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. काय ते जाणून घ्या...
How to be Stress Free : सध्याचा व्यस्त आयुष्यात केवळ मानसिकच नाही तर इतरही कारणं आहेत जी तुमच्या तणावासाठी कारणीभूत ठरतात. मात्र तणावमुक्त (Stress Free) जीवन जगायचं असेल तर भावनात्मक विचार करण्याऐवजी गोष्टीमागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी लक्षात ठेवल्यास तणाव कमी होऊन आनंदी जीवन जगता येईल.
1. स्वत:वरील इतरांचा प्रभाव कमी करा.
कोणं किती श्रीमंत आहे, कोणं कुठे फिरायला गेलं आहे, कोण खूप हुशार आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा विचार करून तुम्ही तुमचा तणाव वाढवू शकता. पण नेहमी स्वतःला कमी लेखू नका. ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा खूप कमी आहे त्यांच्याबद्दल विचार करा. यामुळे तुम्हाला समाधानी राहण्याची सवय लागेल.
2. कृतज्ञ व्हायला शिका.
जे मिळाले नाही किंवा जे कमी आहे त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. पण जे मिळालं आहे त्याबद्दल समाधानी आणि आनंदी राहून कृतज्ञ रहा. तुमच्याकडे जे आहे त्यात नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि इतरांचा द्वेष, मत्सर करणं थांबवा.
3. योग, ध्यान किंवा प्रार्थना करा.
जर तुम्हाला मन:शांती हवी असेल तर योगाची सवय लावा. जर तुम्हाला योग करता येत नसेल तर थोडा वेळ ध्यान करा, चिंतन किंवा ज्या धर्मावर, देवावर तुमची श्रद्धा आणि भक्ती आहे त्याचं ध्यान करा. या सवयीमुळे हळूहळू तुमचे मन शांत होईल. या सवयी तुम्हाला तणावापासून दूर ठेवतील.
4. प्रेम करायला शिका.
आनंदी रहायचे असेल तर इतरांकडून प्रेमाची अपेक्षा न ठेवता स्वतःवर प्रेम करायला शिका. केवळ तुमच्या जोडीदारासाठी किंवा कुटुंबासाठीच नव्हे तर इतरांसाठीही मनात चांगल्या भावना ठेवा. घरात पाळीव प्राणी ठेवा, कधी पक्ष्यांना खायला द्या, गरिबांना मदत करा. या सर्व सवयींमुळे मन प्रसन्न राहील.
5. निरोगी शरीर, निरोगी मन
आजारी असल्यासही व्यक्तीच्या स्वभावात चिडचिडेपणा येतो, त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आजारांपासून दूर राहा. काही समस्या असल्यास त्यावर योग्य उपचार करा. तसेच, आपल्या शरीराची पूर्ण काळजी घ्या कारण तणावमुक्त आयुष्यासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Side Effects Of Lemon : आहारात जास्त लिंबू वापरल्याने होईल नुकसान, 'हे' आहेत दुष्परिणाम
-
Day Nap : दिवसा झोपल्यानं होईल नुकसान, आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय? वाचा...
- Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )