Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या अनेक कलमांतर्गत चालान जारी केले आणि बुलेट जप्त केली. त्यानंतर लायसन न दाखवता आमदारपुत्र निघून गेला.
नवी दिल्ली : बुलेटला मॉडिफाइड सायलेन्सर फिरत असताना पोलिसांनी कारवाईसाठी थांबण्यासाठी सांगताच पप्पा आमदार आहेत असे दरडावणाऱ्या आमदारपुत्राला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी मॉडिफाइड सायलेन्सर असलेली बुलेट जप्त करतानाच 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत पोलिसांचे पथक ओखला परिसरात तपासणी करत होते. दरम्यान, दोन तरुण मॉडिफाईड सायलेन्सरसह बुलेट घेऊन आले. पोलिसांनी थांबवून मोटार वाहन कायद्याचा हवाला देत सायलेन्सर बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यानंतर आमदार पुत्राने वडील आमदार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस आणि आमदार मुलामध्ये वादावादी झाली. पोलिस अधिकाऱ्यानेही मुलाच्या वडिलांशी मोबाईलवर बोलून मी बाईकचे चालान करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या अनेक कलमांतर्गत चालान जारी केले आणि बुलेट जप्त केली. त्यानंतर लायसन न दाखवता निघून गेला.
AAP विधायक अमानतुल्लाह खान के बेटे को पुलिस ने रोक लिया. वो मोडिफाइड बुलेट चला रहा था.
— Ranvijay Singh (@ranvijaylive) January 24, 2025
अमानतुल्लाह खान के बेटे ने कहा- पापा विधायक हैं हमारे pic.twitter.com/yfmmXEQ8Hf
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीने रणधुमाळी सुरु आहे. ओखला विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार आणि विद्यमान आमदार अमानतुल्ला खान यांचा हा मुलगा असून आता व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ओखला विधानसभेच्या नफीस रोडवरील आहे. दिल्ली पोलिस जामिया नगरचे एसएचओ नरपाल सिंह यादव काल रात्री त्यांच्या टीमसोबत गस्तीवर होते. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. यावेळी अमानतुल्ला खान यांचा मुलगा बुलेटवरून आला दुचाकीला मॉडिफाइड सायलेन्सर होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मॉडिफाईड दुचाकी जप्त
दिल्ली पोलिसांनी कडकपणा दाखवल्यानंतर आरोपींनी पोलिस ठाण्यात जाण्यास होकार दिला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या दुचाकीचे चलन केले आणि त्याची दुचाकी जप्त केली. दिल्ली पोलिसांनी 20 हजार रुपयांचे चलन जारी केले आहे. आता कोणीतरी याच घटनेचा व्हिडिओ बनवून फेसबुकवर पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या