एक्स्प्लोर

सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?

Shivaji Dole : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मालेगाव येथील माजी सैनिक, प्रयोगशील शेतकरी  शिवाजी डोळे यांचे भर मंचावरू कौतुक केलंय. मात्र शिवाजी डोळे नेमके कोण? त्यांच्या बद्दल माहिती जाणून घेऊ.

नाशिक : आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांनी जय जवान, जय किसानचा (Jay Jawan Jay Kisan)  नारा दिला होता. यावेळी त्यांनी जवानांसह शेतकऱ्यांनाही सर्वांथाने सक्षम करण्याचे काम सुरू केलं होतं. मात्र मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले त्या वेळेला त्यांनी 'जय जवान, जय किसान' यासह 'जय विज्ञान'चा नारा देखील दिला. मात्र शिवाजी राव (Shivaji Dole) यांना या निमित्याने आज मी सांगू इच्छितो की, आपण एकाच को-ऑपरेटिवच्या माध्यमातून जय जवान, जय किसान आणि लॅबोरेटरी मुद्रा परीक्षण लॅब तयार करून जय विज्ञानला देखील एकाच ठिकाणी स्थानबद्ध करण्याचे कार्य केलंय. असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांनी मालेगाव येथील माजी सैनिक, प्रयोगशील शेतकरी  शिवाजी डोळे (Shivaji Dole) यांचे भर मंचावरू कौतुक केलंय. 

थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नाशिकच्या मालेगाव येथील माजी सैनिक व शेतकऱ्यांनी अजंग येथे उभारलेल्या 538 एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला त्यांनी भेट दिली. या कार्यक्रमाच्या मंचावरुन बोलताना अमित शाह यांनी माजी सैनिक, प्रयोगशील शेतकरी  शिवाजी डोळे(Shivaji Dole) यांचे कौतुक केलंय. मात्र 'जय विज्ञान जय अनुसंधान' या उक्तीला साजेशे काम करणारे आणि महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील जवळपास अठरा हजार लोकांना जोडण्याचे काम करणारे शिवाजी डोळे नेमके कोण?  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून या पूर्वी त्यांचे कुठल्या कामासाठी कौतुक केले. हे जाणून घेऊ.

 शिवाजी शामराव डोळे येऊ मालेगाव (Malegaon) तालुक्यातील एक शेतकरी असून त्यांनी सैनिकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या भागात पाचशे एकर जमिनीवर नंदनवन फुलविले आहे. त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच माजी सैनिकांना बरोबर घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग केले असून त्यांची महती आता देशभरात गेली आहे.

जय जवान, जय किसान, जय विज्ञान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आजच्या मालेगावच्या कार्यक्रमातून शिवाजी डोळे आणि त्यांच्या टीमच्या कार्य कर्तृत्वाबद्दल भरभरून कौतुक केले. शिवाजी डोळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एका लहान गावचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील असून माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं.सैन्यात देशसेवा केल्यानंतर त्यांनी काळ्या आईची सेवा करत शेती करण्याचा निर्णय घेतला. यात डोळे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आज ते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच माजी सैनिकांना बरोबर घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील जवळपास अठरा हजार लोकांना जोडण्याचे काम डोळे यांच्यासह त्यांच्या टीमने केलं आहे.

देशसेवेच्या निवृत्त शेती करण्याचा निर्णय 

तर देशसेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी काही नवीन शिकण्याचं ठरवलं आणि कृषी क्षेत्रात नवे करण्याच्या उद्देशाने कृषी पदविका घेतली. म्हणजे ते जय जवानपासून जय किसानकडे मार्गाक्रमण करत चालले होते. आता सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की, कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त योगदान कसे देता येईल. आपल्या या मोहिमेत सुरवातीला शिवाजी डोळे यांनी 20 लोकांची एक टीम तयार केली. यात काही माजी सैनिकांना देखील सामावून घेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या या पथकानं वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाची एक सहकारी संस्थेचं व्यवस्थापन हाती घेत तिच्या पुनरूज्जीवनाचा निर्णय घेतला. 

पाचशे एकरवर शेतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग 

सद्यस्थितीत शिवाजी डोळे आणि त्यांच्या टीमने यश राज्यासह इतर राज्यातही पसरल्याचे चित्र आहे. वेकंटेश्वरा को ऑपरेटिव्हचा विस्तार अनेक जिल्ह्यात झाला आहे. आज हे पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकात काम करत आहे. तिच्याशी जवळपास 18 हजार लोक जोडले गेले आहेत आणि त्यात मोठ्या संख्येंनं आमचे पूर्व सैनिकही आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य 500 एकर जमिनीत शेती करत आहेत. हे पथक जलसंरक्षणासाठी अनेक तलाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. खास गोष्ट तर ही आहे की, यांनी सेंद्रिय शेती आणि डेअरीही सुरू केली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra : शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं, Murji Patel पोलीस स्टेशनमध्येAnandache Paan : संभाजीराजांचं आग्रा-राजगड प्रवास वर्णन;साधूपुत्र कादंबरी उलगडताना लेखक नितीन थोरातNagpur Violence Update : नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवलीDevendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Embed widget