Day Nap : दिवसा झोपल्यानं होईल नुकसान, आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय? वाचा...
Day Nap Good Or Bad : दिवसा झोपल्याने तुम्हाला काही वेळासाठी ताजेतवानं वाटले मात्र ही सवय काही गंभीर आजारांना आमंत्रण देणारी ठरेल. म्हणून जाणून घ्या आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे.
Ayurvedic Lifestyle Tips : आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील अनेक चुकीच्या सवयी काही गंभीर आजारांचं कारण ठरु शकतात. प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि सुदृढ जीवन जगायचे असते. मात्र यासाठी तुम्हाला चांगल्या सवयीचं पालन करायला हवं. आयुर्वेदामध्ये (Ayurveda) चांगल्या आरोग्यासाठी अनेक सवयींबाबत सांगण्यात आलं आहे. तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेदानुसार काही पद्धतींचा अवलंब करायला हवा. असे केल्यास तुम्हाला दैनंदिन निरोगी आयुष्य जगता येईल.
चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेदामध्ये खाणे, पिणे, झोपणे आणि उठणे अशा सर्व गोष्टींसाठी योग्य पद्धती सांगितल्या आहेत. खाणे, पिणे आणि झोपण्यासंदर्भात चुकीच्या सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. दिवसा झोपणं आयुर्वेदामध्ये चुकीचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. या मागचं कारण जाणून घ्या...
आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्याने कफ वाढतो आणि वात कमी होतो. या परिस्थितीमध्ये कफामुळे होणाऱ्या आजारांचा त्रास वाढतो. पण वात प्रकृतीच्या लोकांना दिवसा झोपेचा फायदा होऊ शकतो. थकवा आल्यावर तुम्ही दिवसातून 15 ते 20 मिनिटे आरामात लोळू शकता. पण झोपणं चांगलं नाही.
या लोकांनी दिवसा झोपू नये
- तुम्ही फिटनेस फ्रीक आहात आणि मानसिक-भावनिक आरोग्याबाबतही जागरूक आहात, त्यांनी दिवसा झोपणे टाळावं.
- जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्हाला स्लिम व्हायचे असेल, त्यांनी दिवसा झोपू नये.
- ज्या व्यक्ती तेलकट आणि मैद्यापासून बनवलेल्या अनेक गोष्टी खातात त्यांनी दिवसा झोपणं टाळावं.
- ज्या लोकांचा प्रकृती कफजन्य आहे, त्यांनीही दिवसा झोपणं टाळावं.
- जर तुम्हाला डायबेटीसची समस्या, पीसीओएसची समस्या किंवा हायपोथायरॉईडची समस्या असेल, तरीही तुम्ही दिवसा झोपू नये.
हे लोक दिवसा झोपू शकतात
- काही मेहनतीच्या कामावेळी किंवा प्रवासात तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले असाल.
- खूप बारीक आणि कमकुवत लोक दिवसा झोपू शकतात.
- शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा आजारी असलेल्या व्यक्ती दिवसा झोपू शकतात.
- ज्या महिलांची प्रसूती झाली आहे.
- आयुर्वेदिक औषधानुसार, ज्यांचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आणि ज्यांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त आहे, ते दिवसा झोपू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Side Effects Of Lemon : आहारात जास्त लिंबू वापरल्याने होईल नुकसान, 'हे' आहेत दुष्परिणाम
- Covid19 Update : बदलत्या ऋतूत वाढतोय कोरोनाचा धोका! आजार टाळण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या
- Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )