HMPV Outbreak: कोरोना पेक्षाही जीवघेणा HMPV व्हायरस? 5 सुरुवातीची लक्षणं तुम्हाला नाही ना? कोणत्या लोकांना धोका अधिक?
HMPV Outbreak: चीनमध्ये पसरणाऱ्या या विषाणूने जगासाठी नवीन आरोग्य आणीबाणी निर्माण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. याची सुरूवातीची काही लक्षणं पाहा..
HMPV Outbreak: कोरोना विषाणूचं नाव काढताच भल्याभल्यांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. कारण काही वर्षांपूर्वी याच विषाणूने जगभरात प्रचंड विध्वंस केला होता. आजही लोक त्या विषाणूने घेतलेले असंख्य जीव आणि मृत्यूचा थरार विसरलेले नाहीत. हा एक प्राणघातक विषाणू होता, जो चीनमधून आला होता, ज्याने जगभरातील लाखो लोकांचे प्राण घेतले. आता चीनमध्ये आणखी एक नवीन विषाणू पसरल्याची बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यावरून हा व्हायरस कोरोनासारखा गंभीर असू शकतो याची पुष्टी होत आहे. या विषाणूचे नाव HMPV असे आहे. या व्हायरसबद्दल सर्व काही जाणून घेऊया. याची सुरूवातीची काही लक्षणं आहेत, जी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहेत.
HMPV व्हायरस म्हणजे काय?
चीनमध्ये पसरणाऱ्या या विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) असे आहे. यासंदर्भातील मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की हा विषाणू मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 सारख्या अनेक विषाणूंच्याच कुटुंबातील आहे. हा एक श्वसन रोग देखील आहे, ज्यामुळे शरीरात फ्लू सारख्या लक्षणांसह समस्या उद्भवतात. चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन विषाणूने जगासाठी नवीन आरोग्य आणीबाणी निर्माण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या नवीन आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
ही सुरूवातीची लक्षणं आहेत
- खोकला
- ताप येणे.
- नाक बंद होणे (श्वास घेण्यास अडचण)
- घसा खवखवणे.
- श्वास घेण्यास त्रास.
BREAKING:
— SARS‑CoV‑2 (COVID-19) (@COVID19_disease) January 1, 2025
China 🇨🇳 Declares State of Emergency as Epidemic Overwhelms Hospitals and Crematoriums.
Multiple viruses, including Influenza A, HMPV, Mycoplasma pneumoniae, and COVID-19, are spreading rapidly across China. pic.twitter.com/GRV3XYgrYX
कोणत्या लोकांना जास्त धोका आहे?
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या व्हायरसचा कोणावरही परिणाम होऊ शकतो, परंतु कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. यामध्ये लहान मुलं, वृद्ध लोक आणि कोणत्याही जुनाट आजाराने ग्रस्त लोकांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणांमध्ये 14 वर्षांखालील मुलांचा समावेश दिसून येत आहे.
चीनची स्थिती आता कशी आहे?
चीनमध्ये पसरलेल्या या व्हायरसची सध्या जगभरात चर्चा होत आहे. हा विषाणू पूर्वीही ओळखला जात असला तरी आता त्याची रुग्णसंख्या अधिक दिसून येत आहेत. चिनी लोकांचे अनेक व्हिडीओ रुग्णालये आणि स्मशानभूमीतून समोर येत आहेत, जे परिस्थितीचे गांभीर्य दर्शवत आहेत. चीनच्या अनेक भागांतून हा आजार पसरल्याचे वृत्त आहे. काही अहवालांनुसार, 16 ते 22 डिसेंबर दरम्यान श्वसन संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. या प्रकरणांमध्ये 14 वर्षांखालील मुलांचा समावेश आहे.
हेही वाचा>>>
HMPV: कोविड-19 नंतर पुन्हा एक मोठे आव्हान? कोरोनानंतर चीनमध्ये 'या' विषाणूचा प्रादुर्भाव, 14 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं संकटात? जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )