एक्स्प्लोर

Allu Arjun Gets Regular Bail: अल्लू अर्जुनला मोठा दिलासा; संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी नियमित जामीन, पण भरावा लागणार मोठा दंड

Allu Arjun Gets Regular Bail: 'पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुनच्या डोक्यावरचं अडचणींचं सावट आता काहीसं दूर झालं आहे. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेत्याला नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Allu Arjun Gets Bail: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2'नं (Pushpa 2 The Rule) जगभरात आपल्या वाईल्ड फायर स्टाईलनं आग लावली आहे. सर्व दिग्गजांचे लाईफटाईम कलेक्शनचे (Lifetime Collection) रेकॉर्ड्स पुष्पा 2 (Pushpa 2) नं धुळीत मिळवलेत. पण, चित्रपटानं दणक्यात बॉक्स ऑफिसवर (Box Office) एन्ट्री घेऊनही एका घटनेमुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. पुष्पा 2 ची घौडदौड सुरू असतानाच हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी (Hyderabad Sandhya Theatre Stampede Incident) पुष्पा फेम अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली. अशातच आता अल्लू अर्जुनसाठी दिलासादायक बाब म्हणजे, संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या प्रीमियरला उपस्थित असताना ही घटना घडलेली. प्रीमियरवेळी थिएटरबाहेर अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अल्लू अर्जुन आपल्या कारमधून बाहेर आला आणि त्यानं सर्वांना हात दाखवला.  पण, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या गर्दीत प्रचंड चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एक महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा लहान मुलगा अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. 

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आधी तेलंगणा उच्च न्यायालयानं आता त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आणि 50,000 रुपयांच्या जामीन जातमुचलक्यावर त्याची सुटका केली होती. अशातच, आता अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. नामपल्ली कोर्टानं अभिनेत्याला जामीन अटींचा भाग म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयांचे दोन जामीन भरण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्या आधारे हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती. 

मृत महिलेच्या जखमी मुलावर उपचारासाठी 2 कोटींची मदत 

24 डिसेंबर रोजी जखमी मुलाचे वडील भास्कर यांनी सांगितलेलं की, 20 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मुलगा आता हळूहळू प्रतिसाद देऊ लागला आहे. त्यांनी अल्लू अर्जुन आणि तेलंगणा सरकारच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. दुसऱ्या दिवशी, 25 डिसेंबर रोजी, चित्रपट निर्माता आणि अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी जखमी बालक श्री तेज आणि त्याच्या कुटुंबासाठी 2 कोटी रुपयांचा निधी आर्थिक सहाय्य म्हणून देत असल्याचं जाहीर केलं.

अल्लू अर्जुन आता व्हेकेशन मोडवर 

पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं (NHRC) पोलीस अधिकाऱ्याला संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आणि या प्रकरणावर आवश्यक कारवाईही करण्यात आली. या घटनेमुळे त्रासलेला अल्लू अर्जुन देखील सुट्टीचा प्लॅन करत आहे आणि या प्रकरणाचा निपटारा होताच, तो व्हेकेशनसाठी जाणार असल्याचं बोललं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2 Box Office Collection Day 30: 'पुष्पा 2'नं 30व्या दिवशी पुन्हा एकदा भल्याभल्या दिग्गजांना पछाडलं; स्त्री 2, जवान-पठान अन् बाहुबली 2 चे सर्व रेकॉर्ड्स धुळीत मिळाले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

China Virus HMPV | चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहा:कार,ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVचं थैमानGraphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special ReportSpecial Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णयSpecial Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Embed widget