Mental Health : नैराश्यासारखीच दिसतात 'या' आजारांची लक्षणं; तुम्हीसुद्धा दुर्लक्ष करता का?
Mental Health : अनेक वेळा नैराश्याची लक्षणे इतर आजारांमध्येही दिसतात. या समस्या नीट समजून घेतल्या नाही तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.
Mental Health : आजकाल मानसिक समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये झपाट्याने वाढत चालली आहे. कमी वयातही लोक तणाव-चिंतेला बळी पडत आहेत. या समस्यांची वेळीच काळजी घेतली नाही, तर नैराश्याचा धोका वाढतो. संशोधकांच्या मते, केवळ मानसिकच नाही तर नैराश्याचे अनेक शारीरिक दुष्परिणामही दिसून येतात, जे खूपच धोकादायक असतात. फार कमी लोकांना माहित आहे की, आपल्या शरीरात अशा काही परिस्थिती आहेत, ज्या डिप्रेशनसारख्या वाटतात, पण ते डिप्रेशन नसतात. त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हा त्रास आणखी वाढू शकतो.
डिप्रेशनची लक्षणे कोणती?
जेव्हा नैराश्य येते तेव्हा दुःख असते. कोणत्याही कामात रस वाटत नाही. ज्या कामातून सर्वात जास्त आनंद मिळतो ते कामही अशा लोकांना करायला आवडत नाही. याशिवाय भूक न लागणे, थकवा जाणवणे, ऊर्जेचा अभाव, झोप न लागणे, अतिविचार, एकाग्रता न लागणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण ही देखील नैराश्याची लक्षणे आहेत.
नैराश्यासारख्या लक्षणांसह धोकादायक रोग
1. क्रोनिक फटीग सिंड्रोम
थकवा हे नैराश्याचे सामान्य लक्षण आहे. पण, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक वेळी थकवा जाणवणे म्हणजे नैराश्य नाही. हे क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम (CFS) चे कारण देखील असू शकते. यातही आवडीचे काम करताना कंटाळा जाणवतो. या आजारात स्मरणशक्ती, एकाग्रता आणि झोपेच्या समस्याही येतात.
2. मधुमेह
यावर अजूनही शोध सुरु आहे, परंतु नैराश्य आणि मधुमेहाची लक्षणे समान असू शकतात. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्याचा धोका जास्त असू शकतो. त्याची अनेक लक्षणे देखील गोंधळात टाकू शकतात. अशक्तपणा, थकवा आणि वजन कमी होणे या दोन्ही आजारांमध्ये सामान्य आहे. मधुमेहींना जास्त तहान लागणे, अंधुक दिसणे, हात किंवा पाय सुन्न होणे, वारंवार लघवी होणे यांसारख्या समस्या नैराश्यात होत नाहीत.
3. हायपोथायरॉईडीझम
नैराश्याने ग्रस्त लोकांमध्ये चिडचिड, दुःख आणि थकवा दिसून येतो. हायपोथायरॉईडीझममध्ये देखील समान समस्या असू शकतात. जेव्हा थायरॉईड ग्रंथी हार्मोन्सचे उत्पादन कमी करू लागते तेव्हा चयापचय मंद होऊ शकतो. यामुळे, रुग्णांमध्ये दुःख, चिंता आणि अशक्तपणा दिसू लागतो. त्वचेचा कोरडेपणा, अनियमित मासिक पाळी किंवा प्रजनन क्षमता आणि मंद हृदयाचे ठोके यांसारख्या समस्या थायरॉईडसाठी तपासल्या पाहिजेत.
4. झोपेची समस्या
जेव्हा तुमचे मन उदास असते, तुम्हाला काम करावेसे वाटत नाही किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये असता तेव्हा झोपेची समस्याही सुरू होते. पण प्रत्येक वेळी झोपेची समस्या उदासीनता नसते. मधुमेह, पचन, हृदयविकार आणि इतर अनेक विकारांमुळेही ही समस्या सामान्य आहे. जर तुम्हाला दीर्घकाळ निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : सावधान! हा 'धोकादायक' आजार मधुमेहाच्या रुग्णांची दृष्टी हिरावून घेऊ शकतो; काळजी घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )