एक्स्प्लोर

Health Tips : लॅपटॉप आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होतायत? 'या' घरगुती उपायांनी मिळवा आराम

Home Remedies For Dry Eyes : डोळे दुखणे, डोळे कोरडे होणे यांसारख्या समस्येसाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा देखील वापर करू शकता.

Home Remedies For Dry Eyes : सध्याच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात अर्ध्याहून अधिक लोकांचा वेळ स्क्रीनवर जातो. त्यामुळे डोळे दुखणे, डोळे कोरडे होणे (Dry Eyes), जड होणे, थकवा येणे, तीव्र वेदना होणे, डोळ्यांत जळजळ होणे अशा समस्या जाणवू लागतात. अनेक वेळा हा त्रास इतका वाढतो की, डोळ्यांची उघडझाप करणं कठीण होऊन जातं. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पण, त्याचबरोबर काही घरगुती उपायांनीसुद्धा तुम्हाला तात्पुरता आराम मिळू शकतो.    

कोरड्या डोळ्यांचा त्रास का होतो?

जेव्हा आपल्या अश्रू ग्रंथी डोळ्यांना पुरेसा ओलावा तयार करण्यासाठी अश्रू तयार करू शकत नाहीत, तेव्हा डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवतो. अशा परिस्थितीत डोळ्यांतील घाण साफ होत नाही, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, वेदना आणि जडपणा येतो.  त्यामुळे डोळे पुरेसे हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. डोळ्यांना आराम देण्याचे काही सोपे उपाय आहेत ते जाणून घ्या.

शरीराला हायड्रेट ठेवा : पुरेसा ओलावा न मिळणे हे डोळ्यांच्या कोरडेपणामागचं एक कारण असू शकतं. त्यामुळे या काळात तुम्ही भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही दिवसातून 10 ग्लास पाणी पिण्याची गरज आहे. याशिवाय डोळ्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी डोळ्यांना ओलावा मिळेल असे काही पदार्थ खा. 

डोळ्यांना गरम पाण्याचा शेक द्या : डोळ्यांना पुरेशा प्रमाणात हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, तेल हे घटक आवश्यक असतात. त्यांच्या कमतरतेमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा सुरू होतो. हॉट वॉटर कॉम्प्रेसमुळे या समस्येत लवकर आराम मिळू शकतो. यासाठी कोमट पाण्यात सुती कापड भिजवा आणि डोळ्यांना शेक द्या. असे केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होईल.  

पापण्यांचा व्यायाम करा : बराच वेळ स्क्रीन टायमिंग डोळ्यांच्या कोरडेपणाचं मुख्य कारण आहे. कामामुळे स्क्रीनच्या वेळेवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर पापण्यांचा व्यायाम करा. यासाठी दर 20 मिनिटांनी पापण्यांची 20 सेकंदांसाठी हळूहळू उघडझाप करा. यामुळे तुमच्या डोळ्यांच्या ग्रंथी शिथिल होतील.

मसाज करा : वेदना कमी करण्यासाठी तुमच्या बोटांनी तुमच्या डोळ्यांना हलक्या हाताने मसाज करा. तज्ज्ञांच्या मते डोळ्यांच्या दुखण्यावर हलक्या हाताने हलका मसाज करणं खूप प्रभावी आहे. त्याच्या मदतीने, रक्ताभिसरणाबरोबर, स्नायूंना आराम देखील मिळतो.

डोळे थंड पाण्यानं धुवा : थंड पाण्यानंही डोळ्यांना खूप आराम मिळतो. लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने डोळे थकतात. अशा वेळी डोळ्यांवर थंड पाण्यानं धुवा, यातून तुम्हाला थोड्या वेळासाठी आराम मिळेल. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget