एक्स्प्लोर

Health News : उष्टे खाल्ल्याने प्रेम नाही तर आजार वाढतात...डॉक्टरांनी दिला सावधनतेचा इशारा

Health News : उष्टं खाल्ल्याने प्रेम नाही तर आजार वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

Falsehood Side Effects : एकमेकांचे उष्ट अन्न खाल्ल्याने प्रेम वाढते असे म्हणतात. अनेकदा आपल्या घरातही कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या ताटातलं खाणं पसंत करतात. प्रेम वाढतं असं सांगत प्रेमी युगुल, मित्रपरिवारदेखील एकमेकांचं उष्टं खाणं पसंत करतात. मात्र, डॉक्टरांच्या मते प्रेम वाढेल की नाही, हे सांगता येणार नाही. पण आजाराचा धोका मात्र, वाढतो.  कोणाचेही उष्टं  खाऊ नका असा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. यामुळे आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.

संसर्गाची भीती

जेव्हा आपण एकाच ताटात एकमेकांचे उष्टं अन्न खातो. तेव्हा संसर्ग पसरण्याचा धोका असतो. जर तुम्ही कोणत्याही आजाराने बाधित व्यक्तीचे उष्टं खात असाल तर ते धोकादायक ठरू शकते. एकाच ताटात खाल्ल्याने सर्दी, फ्लू किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल यांसारखा संसर्ग सहज पसरू शकतात. म्हणूनच चुकूनही आजारी व्यक्तीसोबत एकाच ताटात अन्न खाऊ नये.
 
पचन समस्या

जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या ताटात अन्न खाता तेव्हा ते स्वच्छ आहे की नाही किंवा जेवण देणारी व्यक्ती किती स्वच्छतेने भांडी वापरत आहे हे तुम्हाला माहीत नसते. त्यामुळे अन्नामध्ये बॅक्टेरिया किंवा विषाणू येऊ शकतात. स्वच्छतेच्या अभावी जंतू पोटात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो.
 
पोषक तत्वांची कमतरता

जेव्हा आपण दुसऱ्याच्या ताटात अन्न खातो तेव्हा शरीराला योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये मिळत नाहीत. म्हणजे शरीराला आवश्यक ते पोषण मिळणार नाही.
 
ऍलर्जी समस्या

दुसऱ्याचे उष्टं अन्न खाल्ल्याने ऍलर्जी पसरू शकते. दुसऱ्याची प्लेट शेअर केल्याने क्रॉस कंटॅमिनेशन  होऊ शकते. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. तुम्ही आजारी देखील होऊ शकता
 
जेवताना लक्ष द्या

> जेवण्यापूर्वी हात चांगले धुवा
> चमचे, भांड्यांचा वापर करू अन्न वाढा
> जर एखाद्याला विशिष्ट खाद्यपदार्थाने अन्नाची ऍलर्जी असेल तर त्याला त्याबद्दल सांगा.
> उष्टं खाणे शक्यतो टाळा. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं खरंच गरजेचं आहे का? 

1. पचन आणि चयापचय सुधारते : ​​दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने चयापचय गतिमान होते आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

2. डिटॉक्सिफिकेशन : गरम पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. म्हणजेच, जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायले तर तुमचे शरीर आपोआप डिटॉक्स होईल. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करेल. गरम पाण्याने शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे घाम येण्या सुरुवात होते. तसेच, शरीरात साचलेली घाण घामानेच बाहेर पडते.   

3. वजन कमी करण्यास मदत होते : जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे. यामुळे भूक नियंत्रित करता येते. तसेच, तुम्हाला जास्त प्रमाणात न खाण्याची भावना विकसित होते. गरम पाणी चयापचय गतिमान करते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करते. 

4. हायड्रेशन : सकाळी लवकर कोमट पाणी प्यायल्यानेही शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. हायड्रेटेड राहिल्याने शरीराला विविध कार्य करणे सोपे जाते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. गरम पाण्याने शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे घाम येण्यास सुरुवात होते. शरीरात साचलेली घाण घामानेच बाहेर पडते.   

(Disclaimer :  एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget