(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Worst Food Combination: कारल्यासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पाच पदार्थ, अन्यथा जीवावर बेतू शकतं
आपल्यातील अनेकांना दही आणि ताक प्यायला आवडतं. पण कारल्याची भाजी खाल्यानंतर चुकूनही दही आणि ताक पिऊ नका.
Health Tips : आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की मानवी आरोग्यासाठी कारलं (bitter gourd) अत्यंत चांगलं असतं. तुम्हाला कारलं खाताना कडू लागत असेल पण याच्यात बरेच औषधी गुणधर्म उपलब्ध आहेत. तुम्ही जर दररोज कारलं खात असाल तर तुमच्यापासून अनेक आजार दूर राहतील. दररोज सकाळी मधुमेही रूग्णांना कारल्याचं ताजं ज्यूस दिलं तर अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. यामुळे रक्तातील इन्सुलिनचा स्तर संतुलित करण्याचं काम होतं. कारलं खाल्यामुळे पोटाशी संबंधित आजारही दूर राहतात. ज्याला अस्थमा आणि यकृताशी संबंधित आजार आहेत त्यांनी दररोजच्या जेवणात कारल्याचा समावेश करायला हवं. तसेच कारलं खाण्यामुळे आम्लाचा (अॅसिडिटी) , अपचनाची समस्या निर्माण होत नाही. परंतु कारलं खाल्यानंतर काही पदार्थाच सेवन करणं जीवावर बेतू शकतं. अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर आज आपण कारल्यासोबत जाणीपूर्वक कोणकोणते पदार्थ खाणं आवर्जून टाळायला हवं ते जाणून घेऊया...
कारल्यासोबत हे पाच पदार्थ चुकूनही खाऊ नका
कारलं आणि दूध
तुम्ही जर जेवणात कारलं आणि दूध सोबत खात असाल तर आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे कारलं आणि दूध चुकूनही सोबत खाऊ नका. यामुळे पोट बिघडतं. तसेच पोटात बद्धकोष्टता, जळजळ आणि त्रास होऊ शकतो. जर तुम्ही आधी पोटाच्या समस्येनं त्रस्त असाल तर कारल्यासोबत दूग्धजन्य पदार्थ खाणं धोकायदायक ठरू शकतं.
दही
आपल्यातील अनेकांना दही आणि ताक प्यायला आवडतं. पण कारल्याची भाजी खाल्यानंतर चुकूनही दही आणि ताक पिऊ नका. याचं कारण दही आणि ताकात लॅक्टिक अॅसिड असल्यामुळे कारल्यातील पोषण तत्वांशी क्रिया होऊन शरीरावर त्वचेची समस्या निर्माण होऊन खाज सुटू शकते. म्हणून चुकूनही कारल्यासोबत दही आणि ताकाचं सेवन करू नये.
आंबा
आपल्या प्रत्येकाला आंबा खायला आवडतो. आंबा जितका गोड आणि चवदार आहे याच्या उलट कारलं अत्यंत कडू असतं. या दोघांतील गुणधर्मातील फरक लक्षात घेता दोघांना एकत्र खाऊ नये. यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कारण पचायला खूप जड जातं. तसेच उल्टी, मळमळ, छातीत जळजळ आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतं. त्यामुळे आंबा आणि कारलं सोबत खाऊ नये.
भेंडी
कारलं आणि भेंडीची भाजी कधीही सोबत खाऊ नका. यामुळे तुमच्या आरोग्याचं मोठ नुकसान होऊ शकतं. भेंडी आणि कारलं सोबत खाण्यामुळे पचनास समस्या निर्माण होऊ शकतं. त्यामुळे भेंडी आणि कारलं एकत्र खाणं टाळा.
मुळा
तुम्ही कारलं आणि मुळा यांना सोबत खात असाल तर तुम्हाला आजारी पाडण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. दोघांच्या मूळ गुणधर्मात खूप फरक आहे. त्यामुळे पोटात जाऊन गडबड होऊ शकते. ज्यांना आधीपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास आहे त्यांनी चुकूनही कारलं आणि मुळी एकत्र खाऊ नये. यामुळे गळ्यात कफची समस्या निर्माण होऊ शकते आणि अॅसिडिटीचाही त्रास होऊ शकते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )