Health Tips : तुम्हाला आंबे खायला आवडतात का? जरा थांबा आंबे खाण्याचे तोटे जाणून घ्या
Health Tips: आंबा खाण्याआधी काही तास पाण्यात भिजत ठेवा, त्यानंतर खा त्यामुळे काय होईल आंब्यातली उष्णता कमी होण्यास मदत होईल. पण जर तुम्ही आंबे जास्त प्रमाणात खाल्लं तर तुम्हाला अतिप्रमाणात आंबे खाण्याचा तोटे देखील सहन करावे लागतील.
आंब्याला (Mango) फळांचा राजा असं म्हणटलं जातं, आंबा प्रेमी कधीही आंबा खाण्यासाठी तयार असतात. आंब्याचे विविध प्रकार आहेत . त्यात हापूस , केशरी, , लंगडा, पायरी, बदामी हे आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. आंबा जेवढा गोड तेवढे आंबे खाण्याचे तोटेदेखील आहेत, ते जाणून घेतले पाहिजेत. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A) आणि व्हिटॅमिन डी ((Vitamin D) देखील भरपूर असते. आंबे खा त्यात काही गैर नाही, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. आंबा खाण्याआधी काही तास पाण्यात भिजत ठेवा, त्यानंतर खा , त्यामुळे काय होईल आंब्यातली उष्णता कमी होण्यास मदत होईल. पण जर तुम्ही आंबे जास्त प्रमाणात खाल्लं तर तुम्हाला अतिप्रमाणात आंबे खाण्याचा तोटादेखील सहन करावे लागतील. त्यामुळे आंब्याचं प्रमाणात सेवन करावं जाणून घेऊयात अतिप्रमाणात आंबा खाण्याचा तोटा काय आहे
वजन वाढणे (weight gain)
आंब्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज (Calories)असतात. आंब्यातील कॅलरीज तुमचं वजन वाढवू शकतात. आणि जर तुम्ही वजन कमी (lose weight)करण्याचा प्रयत्न करताय तर आंबा मर्यादित प्रमाणात खा. जेणेकरुन तुम्हाला कॅलरीज कमी करण्यासाठी जास्त कसरत करावी लागणार नाही.
मुरुम येणे : (Acne)
आंबा हे सर्वात उष्ण फळ मानलं जात. जर तुमची त्वचा (skin) तेलकट असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणात आंबे खाल्ले तर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम, फोड येऊ शकतात.त्यामुळे तुम्ही आंबा प्रमाणात खा.
रक्तातील साखरेची पातळी वाढते : (sugar levels rise)
जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) असेल तर अतिप्रमाणात आंबा खाणं चांगल नाही,ज्यांना मधुमेह आहे त्यांनी नियंत्रणात आंबे खावेत. मधुमेहांची चाचणी नियमित करावी शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच आंबा खावा,नाहीतर आंब्यापासून चार हात लांबच राहा
पोट बिघडणे : (upset stomach)
जास्त प्रमाणात आंबा खाल्ला तर तुमचं पोट खराब होऊ शकतं, आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर (fiber)असतं. जास्त आंबा खाल्ला तर अतिसार होण्याची शक्यता असते. न पिकलेला आंबा खाल्ला तर पोटात दुखू शकत. त्यामुळे आंब्याचं प्रमाणात सेवन करावं
अॅलर्जी : (Allergies)
आंबे जास्त खाल्ले तर त्वचेवर अॅलर्जी होण्याची शक्यता जास्त असते. जर आंबा खाल्यामुळे तुम्हाला त्वचेवर अॅलर्जी होत असेल तर आंबा खाणं त्वरीत बंद करा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )