Health Tips : भेगा पडलेल्या टाचांचा आरोग्याशी नेमका संबंध काय? वाचा तज्ज्ञांचं मत
Health Tips : थंड वारा सुरू झाल्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होऊ लागते आणि त्यामुळे टाचांना भेगा पडण्याची समस्या खूप त्रासदायक बनते.

Health Tips : भेगा पडणे हे सामान्यतः सामान्य लक्षण मानले जाते. विशेषतः हिवाळ्यात, बहुतेक लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. यासाठी लोक महागडे मॉइश्चरायझर आणि घरगुती उपायांचा वापर करतात. एवढे करूनही जर तुम्हाला टाचांच्या भेगा पडण्याच्या समस्येपासून आराम मिळत नसेल, तर त्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यामागे कोणताही गंभीर आजार नसला तरी काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही टाचांना भेगा पडण्याची समस्या उद्भवू शकते.
थंड वारा सुरू झाल्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होऊ लागते आणि त्यामुळे टाचांना भेगा पडण्याची समस्या खूप त्रासदायक बनते. काही घरगुती उपायांनी भेगा पडलेल्या टाचांना बरे करता येते, पण ही समस्या कायम राहिल्यास जाणून घ्या त्यामागील संभाव्य कारण काय असू शकते.
क्रॅक टाचांची सामान्य कारणे कोणती?
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेमध्ये कोरडेपणा वाढतो, त्यामुळे टाचांना तडे जातात. याशिवाय थंड जमिनीवर जास्त वेळ अनवाणी चालणे किंवा थंड पाण्यात सतत काम केल्यानेही टाचांना भेगा पडण्याची समस्या उद्भवू शकते. यावर वेळीच काळजी न घेतल्यास, जखमा देखील होऊ शकतात.
'या' पोषक तत्वांची कमतरता असू शकते
काही वेळा पौष्टिकतेची कमतरता हे देखील टाचांना तडे जाण्याचे कारण असू शकते, कारण शरीराला योग्य पोषण न मिळाल्याचा परिणाम केवळ तुमच्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही दिसून येतो. शरीरात व्हिटॅमिन सी, बी3, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे देखील टाचांना भेगा पडण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ही समस्या कायम राहिल्यास तज्ज्ञांशी संवाद साधा.
पाय स्वच्छतेचा अभाव
बहुतेक लोक चेहऱ्याच्या आणि हातांच्या त्वचेची काळजी घेतात. पण, पायांकडे दुर्लक्ष करतात. पायांच्या स्वच्छतेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे, कारण चेहऱ्यापेक्षा आपले पाय धूळ, माती आणि बॅक्टेरियाच्या संपर्कात असतात.
मधुमेहाचाही परिणाम होतो
मधुमेहाच्या लक्षणांपैकी एक म्हणजे त्वचेचा संसर्ग किंवा त्वचा जाड होणे, ज्यामुळे त्वचेचा पोत बदलू लागतो. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असल्याने जखमाही लवकर भरून येत नाहीत. त्यामुळे, जर तुमच्या टाचांच्या भेगा बऱ्या होत नसतील तर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची एकदा तपासणी करून घ्यावी.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
