Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं
Health Tips : बर्याच वेळा आपल्याला चक्कर येणे, थकवा जाणवणे, स्नायू दुखणे किंवा अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसतात.
Health Tips : काही वेळा, सकाळी (Morning) उठल्याबरोबर आपल्याला शरीर दुखणे, थकवा, अस्वस्थता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला अशी समस्या सतत भेडसावत असेल तर त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात काही ना काही पोषक तत्वांची कमतरता आहे. शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नसल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या समस्यांनी त्रस्त असाल, तर शरीराला कोणत्या पोषक तत्वांची जास्त गरज आहे आणि त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काय समाविष्ट करणं गरजेचं आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कॅल्शियमची कमतरता
बर्याच वेळा आपल्याला चक्कर येणे, थकवा जाणवणे, स्नायू दुखणे किंवा अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसतात. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असे बरेचदा घडते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि स्नायूंमध्ये समस्या निर्माण होतात. चक्कर येणे, थकवा येणे आणि इतर लक्षणे ही या कमतरतेची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत दूध, दही, चीज यांसारख्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावं. कॅल्शियमचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
फायबरची कमतरता
शरीरात फायबरची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. फायबरच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेकदा थकवा येतो आणि चक्कर येते. फायबरच्या कमतरतेमुळे होणारी समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या आहारात भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि कडधान्ये यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. फायबर हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.
लोहाची कमतरता
शरीरात लोहाची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. लोहाच्या कमतरतेमुळे सकाळी उठल्यावर पुन्हा पुन्हा थकवा जाणवतो. याबरोबरच डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दिसणे किंवा दुहेरी दृष्टी येणे यांसारखी लक्षणेही दिसतात. अशा परिस्थितीत पालक, बीन्स, अंडी यासारख्या लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. तरच थकवा आणि चक्कर येण्यापासून तुम्हाला आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :