हँड सॅनिटायझर की साबण... आजारांपासून बचावासाठी सर्वात सुरक्षित काय?
कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. मग ते साबणाने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने. परंतु, अनेकांना प्रश्न पडला आहे की, साबण आणि हँड सॅनिटायझर दोघांपैकी हात स्वच्छ ठेवण्यासाठी आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात उपयुक्त काय ठरतं?
नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु होताच. कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना जारी करण्यात आल्या. त्यामधील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे, आपले हात वेळोवेळी स्वच्छ करणं. मग ते साबणाने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने. परंतु, अनेकांना प्रश्न पडला आहे की, साबण आणि हँड सॅनिटायझर दोघांपैकी हात स्वच्छ ठेवण्यासाठी आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात उपयुक्त काय ठरतं? याबाबत आता हेल्थ एक्सपर्ट्सनी खुलासा केला आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरऐवजी साबणाचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरतं. तसेच हे आर्थिकदृष्ट्याही किफायतशीर आहे.
अमेरिकेतील सीमन्स यूनिवर्सिटीतील हायजीन प्रोफेसर एलिझाबेथ स्कॉट यांनी केलेल्या रिसर्चनुसार, हात स्वच्छ करण्यासाठी साबण आणि पाण्याने धुतल्यानंतर टॉवेलला पुसणं सर्वात उत्तम उपाय मानला जातो. त्यांचं म्हणणं आहे की, असं केल्याने साबण आपल्या हातांवर लागलेले सर्व बॅक्टेरिया नष्ट करण्यासोबतच हातांची त्वचाही कोरडी करतो, त्यामुळे त्यानंतर लगेच आपल्या हातांवर व्हायसर लगेच चिटकत नाही. परिणाणी संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
हेल्थ एक्सपर्टचं म्हणंणं आहे की, पाण्याच्या व्यवस्था नसेल तर हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचसोबत त्यांचं म्हणणं आहे की, सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण सर्वाधिक असतं. 60 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल असणारे सॅनिटायझरमुळे हातांची जळजळ होऊ शकते. तसेच सॅनिटायझर, साबण यांच्या तुलनेत कोरोना व्हायरससोबतच रायनोव्हायरस सारख्या नॉन एनवलप्ड व्हायरसवर कोणताच परिणाम होत नाही.
दरम्यान, लोकांना स्वच्छतेबाबत जागृत करण्यासाठी दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी ग्लोबल हँडवॉश डे साजरा केला जातो. सध्या संपूर्ण जगभरात फैलावलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांना स्वच्छतेचं महत्त्व अधिक प्रकर्षतेने जाणवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Health Tips : ब्रेकफास्टमध्ये नियमित अंडी खाण्याचे फायदे!
- सरसकट अँटीबायोटीक्सचे सेवन बेतू शकते जीवावर; दुर्मिळ आजाराचे पुण्यात निदान
- Health Tips : जास्त ताण आणि वारंवार नाकातून रक्त येणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )