Health Tips : जास्त ताण आणि वारंवार नाकातून रक्त येणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते
High Blood Pressure : बहुतेक वेळा उच्च रक्तदाब समस्येकडे लोकं दुर्लक्ष करतात. मात्र, आपण याबद्दल सावधगीरी बाळगणे आवश्यक आहे. आज आपण उच्च रक्तदाबाच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत.
Health Tips: सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. जगातील बरीच लोकं या समस्येशी झगडत आहेत. निरोगी राहण्यासाठी रक्तदाब खूप महत्वाचा आहे. उच्च रक्तदाबात रक्तवाहिन्यांमध्ये रक्तदाब वाढू लागतो. दबाव वाढल्यामुळे, रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी हृदयाला अधिक काम करण्याची आवश्यकता असते. बहुतेक लोक उच्च रक्तदाब समस्येकडे दुर्लक्ष करतात. काही लोक औषधे घेऊन रक्तदाबावर नियंत्रण ठेवतात. अशा परिस्थितीत आपण त्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मात्र, वेळीच यावर उपाययोदना केल्यातर रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. चला आज याबद्दलचं जाणून घेऊया.
उच्च रक्तदाबची सुरुवातीची लक्षणं उच्च रक्तदाबाच्या सुरुवातीच्या काळात, व्यक्तीच्या डोक्याच्या मागील भागात आणि गळ्यामध्ये वेदना सुरू होते. बर्याच वेळा आपण या समस्यांकडे दुर्लक्ष करतो, जे नंतर एक मोठी समस्या बनते.
तणाव जाणवतो
जर तुम्हाला जास्त ताण येत असेल तर ते उच्च रक्तदाबचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत व्यक्तीला लहान-सहान गोष्टींवरुन राग येतो. बर्याचवेळा योग्य-अयोग्य ओळखण्यात अडचणी येतात. अशावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
#MentalHealthDay : कोरोना काळात मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी? तज्ञांच्या काही टीप्स
चक्कर येणे हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींना चक्कर येणे सामान्य आहे. शरीरात अशक्तपणामुळे बर्याचदा डोके गोलाकार फिरल्यासारखे वाटते. या प्रकरणात, आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.थकवा जाणवणे थोडेसे काम केल्यावर किंवा थोड्या वेगाने चालण्यास त्रास होत असेल तर आपण उच्च रक्तदाबाचे रुग्ण होऊ शकता.
नाकातून रक्त वाहणे जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर एकदा डॉक्टरांशी संपर्क साधा. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाब ग्रस्त होण्याची शक्यता जास्त असते. यासह, जर आपल्या नाकातून रक्त येत असेल तर आपण ते तपासून घ्यावे.
झोप न येणे बहुधा असे दिसून आले आहे की उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना रात्री झोप येत नागी. ही समस्या थोडी चिंता किंवा निद्रानाशमुळे देखील होऊ शकते.
हृदयाची धडधड वाढणे जर आपल्या हृदयाचे ठोके अचानक वाढले असतील किंवा आपल्या हृदयात वेदना होत असेल तर ते उच्च रक्तदाबमुळे देखील होऊ शकते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )