एक्स्प्लोर

Tomato Flu in Children : देशातील 'ही' तीन राज्ये टोमॅटो फ्लूच्या विळख्यात; लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका जास्त

Tomato Flu Infection in Children : देशात आतापर्यंत या फ्लूची लागण झालेल्या बालकांमध्ये पाच वर्षांखालील मुलांचा समावेश असला तरी या फ्लूमध्ये मुलांमध्ये खूप ताप, जुलाब, सांधेदुखी अशी लक्षणे दिसतात.

Tomato Flu Infection in Children : देशात आजकाल लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वेगाने पसरत आहे. हा वेगाने पसरणारा संसर्ग म्हणजेच टोमॅटो फ्लू (Tomato Flu). हा संसर्ग पाच वर्षांखालील मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे. देशात आतापर्यंत या फ्लूची लागण झालेल्या बालकांमध्ये 0 ते 9 वर्ष वयोगटातील बालकांचा समावेश असला तरी या फ्लूमध्ये मुलांमध्ये खूप ताप, जुलाब, सांधेदुखी अशी विविध लक्षणे दिसतात. हा फ्लू आणि त्याची लक्षणे चिकुनगुनिया आणि डेंग्यू सारखीच असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 6 मे रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात या फ्लूने ग्रस्त मुलाची पहिली केस नोंदवली गेली आणि 26 जुलैपर्यंत टोमॅटो फ्लूने ग्रस्त मुलांची संख्या 82 वर पोहोचली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सरकारी रुग्णालयाकडून या फ्लूची लागण झालेल्या 26 बालकांची माहिती देण्यात आली. या मुलांचे वय 1 ते 9 वर्षे दरम्यान आहे. मात्र, एकूण बाधित मुलांमध्ये 1 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.

या आजारात लहान मुलांच्या जीवाला सहसा कोणताही धोका नसतो. मात्र, त्याचा संसर्ग मुलांमध्ये झपाट्याने पसरतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. केरळ व्यतिरिक्त ओरिसा आणि तामिळनाडू राज्यांमध्ये या आजाराचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. मात्र, आतापर्यंत देशातील इतर कोणत्याही राज्यातून या फ्लूचे एकही प्रकरण समोर आलेले नाही.

टोमॅटो फ्लू कसा पसरतो?

  • संक्रमित मुलाच्या संपर्कात येणे.
  • संक्रमित वस्तूच्या संपर्कात येणे.
  • जर मुलाने संक्रमित वस्तूंना स्पर्श केल्यानंतर तोंडात हात घातला.

टोमॅटो फ्लूची लक्षणे काय आहेत?

  • उच्च ताप
  • पुरळ
  • सांधे दुखी
  • जंतुसंसर्ग
  • थकवा
  • मळमळ
  • उलट्या
  • अतिसार
  • निर्जलीकरण
  • सांधे सुजणे
  • संपूर्ण शरीर वेदना

यामध्ये खूप ताप, अंगावर पुरळ येणे आणि सांधेदुखी ही लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यावर दिसून येतात, त्यानंतर कालांतराने इतर लक्षणेही दिसू लागतात. टोमॅटो फ्लूची लक्षणे चिकनगुनिया आणि डेंग्यू सारखीच असतात. त्यामुळे या रोगांचा संसर्ग टाळण्यासाठी उपचार आणि प्रतिबंधाचे उपाय देखील सारखेच आहेत. 

अशा प्रकारे काळजी घ्या : 

टोमॅटो फ्लू या आजारापासून जर दूर राहायचे असेल तर, त्यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामध्ये मुलाला खाज सुटणार नाही, तसेच मुलांना स्वच्छ ठेवणे, त्यांना नीट विश्रांती देणे तसेच वेळोवेळी पाणी देत राहणे यांसारख्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. संबंधित लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kalyan Dombivali : आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी टोळक्याचा हैदोस, पोलिसांवर दगडफेकDevendra Fadnavis : लहानपणीच्या खोडकर आठवणी ते राजकारण देवाभाऊंच्या सख्या बहिणी ExclusiveMahayuti Oath Ceremonyमहायुती 2.O सरकारचा शपथविधी,सागर बंगल्याबाहेर 'महाराष्ट्र थांबणार नाही'चे बॅनरTop 9 Sec Superfast News  : Maharashtra : Mahayuti Oath Ceremony : महायुतीचा शपथविधी : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Eknath Shinde & Devendra Fadnavis: वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये फडणवीस-शिंदेंमध्ये नेमकी काय डिल झाली? गृहखात्याच्या मोबदल्यात शिवसेनेला कोणतं महत्त्वाचं खातं मिळणार?
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये नेमकी कोणती डिल झाली? शिवसेनेला गृहखात्याच्या मोबदल्यात कोणतं खातं मिळणार?
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
Embed widget