एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?

Devendra Fadnavis Sisters Exclusive : देवेंद्र फडणवीस यांच्या बहि‍णींनी त्यांच्या लहानपणीच्या गमतीशीर आठवणी सांगितल्या आहेत. 

Devendra Fadnavis : महायुती सरकारचा शपथविधी (Mahayuti Oath Ceremony) सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या बहिणी भावना खरे आणि मंजुषा दीक्षित यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांच्या बहि‍णींनी देवेंद्र फडणवीस यांचा लहानपणीचा किस्सा सांगितला आहे. 

2022 साली देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या सहज खायचे, असं वक्तव्य केलं होतं. अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली होती. तर देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील करण्यात आले होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या बहि‍णींनी लहानपणीच्या गमतीशीर आठवणी सांगितल्या आहेत. 

नेमकं काय म्हणाल्या देवेंद्र फडणवीसांच्या बहिणी? 

आमचे लहानपण अत्यंत आनंददायी गेले. तो खोडकर आणि खेळकर होता.  एकदा आम्ही गणपती-गणपती खेळत होतो. देवेंद्रला गणपती केले होते. आम्ही बनवलेले पोह्याचे 21 मोदक देवेंद्रने खाऊन टाकले. देवेंद्र म्हणाला मी गणपती आहे ना, मग हे मोदक मी खाणार, असा लहानपणीचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. देवेंद्र फडणवीसांच्या बहि‍णींनी केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 

बहि‍णींनी लाडक्या भावांना बहुमताने निवडून आणलं

त्या पुढे म्हणाल्या की, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सगळ्यांनी त्याला भरघोस यश दिले आहे. देवाला निवडून आणल्याबद्दल अभिनंदन. त्याचा 2019 पासूनचा काळ फार खडतड होता. त्याला भयंकर त्रास झाला तो आम्ही कधी चर्चेत जरी आणलेला नसला तरी तो कायम दिसत होता. निवडणुकीत महिलांचा सहभाग मतदानात असायचाच. मात्र, या वेळेस लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केले. त्यांनी लाडक्या भावांना बहुमताने निवडून आणले आहे. त्यात बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याचे भावना खरे आणि मंजुषा दीक्षित यांनी म्हटले. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी 2019 नंतरचा काळ खूप कठीण गेला, मी पुन्हा येईलच्या घोषणेची टिंगल करण्यात आली. याबाबत विचारले असता त्याच्या बोलण्यातून कधी जाणवले नाही. मात्र लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे बॉडी लँग्वेज वरून कळून येत होते. तो कधी बोलत नाही पण जवळच्या माणसांना त्याला किती त्रास होत होता, हे समजत होते. तुम्हीही काहीही करा, मला काही फरक पडणार नाही, मी माझं काम करणार, माझं काम एक दिवस बोलेल, अशी भूमिका देवेंद्रने घेतली होती. त्याच्या कामाने आज बोलून दाखवले, असेही त्यांच्या बहि‍णींनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Embed widget