एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?

Devendra Fadnavis sisters : देवेंद्र फडणवीस यांच्या बहिणी भावना खरे आणि मंजुषा दीक्षित यांनी एबीपी माझावर विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

नागपूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ठरले असून त्यांना मतदार बहिणींनी भरघोस मतदान ही केले आहे. मात्र, आपल्या भावाबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या खऱ्या बहिणींना काय वाटतंय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला आहे. 

बालपणी उन्हाळी सुट्टीत एकट्या देवेंद्रने खेळ मस्करित कसे 21 मोदक एकटे खाल्ले होते, या खोडकर आठवणी पासून, तर देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या वीस वर्षांच्या वयात कोणाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणनीतीचे पहिले धडे घेतले? याचे गुपितही देवेंद्र फडणवीस यांचा बहिणींनी सांगितले आहे. एवढेच नाही तर 2019 मध्ये बहुमत असताना पदरी पडलेल्या अपयशाबद्दल फडणवीसांना नेमके काय विचार करायचे? विरोधकांनी केलेल्या टिंगल टवाळी आणि शरीरयष्टीबद्दल होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल देवेंद्र फडणवीस  आणि कुटुंबीयांना काय वाटायचे? या सर्व मुद्द्यांवर ही फडणवीस यांच्या बहिणी बोलल्या आहेत. "एक अकेला देवेंद्र क्या करेगा" या सुप्रिया सुप्रिया सुळेंच्या टीकेचे उत्तर जरी देवेंद्र फडणवीसांनी आजवर दिले नसले, तरी त्यांच्या बहिणींनी मात्र या मुद्द्यावर सडेतोड प्रतिक्रिया दिल्या आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बहिणी भावना खरे आणि मंजुषा दीक्षित नेमकं काय म्हणाल्या ते जाणून घेऊयात...

निवडणुकीत बहिणींचा सिंहाचा वाटा

तुमचे बंधू राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत काय भावना आहेत? असे विचारले असता त्यांच्या भगिनी म्हणाल्या की, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सगळ्यांनी भरघोस यश त्याला दिले आहे. देवाला निवडून आणल्याबद्दल अभिनंदन. त्याचा 2019 पासूनचा काळ फार खडतड होता. त्याला भयंकर त्रास झाला तो आम्ही कधी चर्चेत जरी आणलेला नसला तरी तो कायम दिसत होता. निवडणुकीत महिलांचा सहभाग मतदानात असायचाच. मात्र, या वेळेस लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केले. त्यांनी लाडक्या भावांना बहुमताने निवडून आणले आहे. त्यात बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

फडणवीसांचा लहानपणीचा किस्सा 

देवेंद्र फडणवीस यांच्या लहानपणीच्या आठवणीबाबत विचारले असता त्यांच्या भगिनी म्हणाल्या की, आमचे लहानपण अत्यंत आनंददायी गेले. तो खोडकर आणि खेळकर होता.  एकदा आम्ही गणपती-गणपती खेळत होतो. देवेंद्रला गणपती केले होते. आम्ही बनवलेले पोह्याचे 21 मोदक देवेंद्रने खाऊन टाकले. देवेंद्र म्हणाला मी गणपती आहे ना, मग हे मोदक मी खाणार, असा लहानपणीचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. 

1990 च्या निवडणुकीची आखली रणनीती

शोभाताई फडणवीस यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना राजकीय धडे मिळाले का? असे विचारले असता मंजुषा दीक्षित म्हणाल्या की, आई पहिल्यांदा आमदार झाल्या. तेव्हा तो जेमतेम वीस वर्षांचा होता. तेव्हा प्रचारात पुढाकार घेऊन छोटे-छोटे भाषण देवेंद्रने दिले होते. माझ्या आईकडून आणि त्याच्या वडिलांकडून त्याला राजकीय बाळकडू मिळाले. निवडणुकीचा रणनीतीचा त्याचा पहिला अनुभव 1990 ची निवडणूक होती, असे त्यांनी म्हटले. 

पहिल्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी

देवेंद्र फडणवीस फार कमी वयात नगरसेवक झाले याबाबत काय आठवणी आहेत असे विचारले असता त्यांच्या भगिनी म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस आमच्या पिढीतलं पहिलं उदाहरण आहे की, इतक्या लहान वयात पहिल्यांदा तो नगरसेवक झाला. त्याचे बाबा जेव्हा राजकारणात होते तेव्हा जनसंघाला खूप संघर्ष करावा लागला. देवेंद्रला थोडाफार बेस मिळाला होता. त्याला पहिले नगरपालिकेतील तिकीट मिळाले तेव्हा त्याने खूप काम केले, घरोघरी पायी हिंडला. तेव्हाही तो प्रचंड बहुमताने निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.  

त्याच्या कामाने आज बोलून दाखवले

2019 नंतरचा काळ देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खूप कठीण गेला, मी पुन्हा येईल च्या घोषणेची टिंगल करण्यात आली. याबाबत विचारले असते त्यांच्या भगिनी म्हणाल्या की, त्याच्या बोलण्यातून कधी जाणवले नाही. मात्र लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे बॉडी लँग्वेज वरून कळून येत होते. तो कधी बोलत नाही पण जवळच्या माणसांना त्याला किती त्रास होत होता, हे समजत होते. सगळं विष त्यांनी पचवलं. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा आपण आपले मन वळवण्यासाठी काहीतरी काम करतो. त्याने आपल्या कामात आपले मन वळवून घेतले. तुम्हीही काहीही करा, मला काही फरक पडणार नाही, मी माझं काम करणार, माझं काम एक दिवस बोलेल, अशी त्याची भूमिका होती. त्याच्या कामाने आज बोलून दाखवले, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

एक अकेला सब पे भारी पड गया

"एक अकेला देवेंद्र क्या करेगा", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. याबाबत विचारले असता एक अकेला सब पे भारी पड गया, बाप निकला सबका, ज्यांनी कोणी एक अकेला देवेंद्र क्या करेगा म्हटलं त्यांचा सुफडा साफ झाला. आता त्यांनी पुन्हा हिंमत करू नये, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. 

आणखी वाचा 

Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
Embed widget