Health: तुमच्या कंबरेचा आकारच सांगेल, तुम्हाला मधुमेह आहे की नाही? नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा
Health: मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नेहमीच काही संशोधन केले जाते. कंबरेचा आकार आपल्याला मधुमेहापासून कसा वाचवू शकतो हे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे.
Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव यासारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलं. ज्यापैकी मधुमेहाचे प्रमाण जगभरात झपाट्याने वाढत आहे, त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हा एक असाध्य आजार मानला जातो, कारण या आजारातून रुग्णाला पूर्ण आराम मिळत नाही. तुम्ही फक्त त्यावर नियंत्रण ठेवू शकता. मधुमेह म्हणजे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. या आजारावर दररोज काही ना काही संशोधन होत आहे. नवीन अभ्यासाच्या निकालांबद्दल बोलताना, आपल्या कंबरेचा आकार आपल्याला मधुमेह आहे की नाही हे ठरवू शकतो? जाणून घ्या काय म्हटलंय या संशोधनात?
मधुमेह आणि कंबरेच्या आकाराचा संबंध
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हे संशोधन चीनच्या नॉर्दर्न जिआंगसू पीपल्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. या संशोधनात मधुमेह आणि कंबरेच्या आकाराचा संबंध सांगितला आहे. याशिवाय, कंबरेचा आकार आणि मृत्यू दर यांच्याशी मधुमेहाचा संबंध असल्याचं देखील या संशोधनात सांगण्यात आलं आहे.
संशोधनाचा परिणाम काय आहे?
रिपोर्टनुसार, या संशोधनात 3151 महिला आणि 3473 पुरुषांवर चाचणी करण्यात आली. हे सर्व लोक मधुमेहाचे रुग्ण होते. तसं पाहायला गेलं तर, हे संशोधन मधुमेही रुग्णांच्या जगण्याचा दर समजून घेण्यासाठी करण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांच्या कंबरेचा आकार महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्या महिलांचा आकार 107 सेमी होता, त्यांचा मृत्यू दर कमी होता. यावर संशोधन पथकाने म्हटले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांनी वजन नियंत्रित ठेवल्यास आणि कंबरेचा आकार राखल्यास ते रोग आणि मृत्यू या दोन्हींवर मात करू शकतात.
कंबरेचा आकार कसा कमी करायचा?
- कंबरेची चरबी कमी करण्यासाठी आपण प्रथम आपल्या आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी केले पाहिजे.
- तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.
- मेथीचे पाणी प्यायल्याने कंबरेची चरबी कमी करता येते.
- दररोज व्यायाम करणे फायदेशीर आहे,
- तुम्ही व्यायामामध्ये क्रंच, प्लँक आणि साइड प्लँक करू शकता.
- गोड पदार्थांचे सेवन कमी करा.
हेही वाचा>>>
Weight Loss: महिन्याभरात शरीरातील चरबी विरघळेल, वजन होईल कमी, फक्त रात्रीच्या जेवणानंतर या 5 गोष्टी करू नका..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )