Health : जिम आणि डाएटपेक्षाही वरचढ 'या' गोष्टी, पोटावरची चरबी अशी वितळेल, की पोट जाईल आत
Health : जर तुम्हाला जिममध्ये न जाता किंवा महागड्या डाएट प्लॅनचे पालन न करता वजन कमी करायचे असेल, तर काही आयुर्वेदिक उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
Health : आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, खाण्याच्या अयोग्य वेळा या गोष्टींमुळे अनेकजण विविध आजारांनी ग्रासलेत. व्यायामाचा अभाव असल्यामुळे अनेक जणांचं वजन वाढत चाललंय. त्यात इतर जबाबदाऱ्यांमुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे प्रत्येकाला लवकरात लवकर वजन कमी करायचं असतं. पण वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी नेमकं काय करावं? वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, पोटाची चरबी कशी कमी करावी? जिमशिवाय वजन कसे कमी करावे? पोटाची चरबी कशी कमी करावी? हे असे प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे संपूर्ण जगाला जाणून घ्यायची आहेत....
हे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत, तर..
जगातील बहुतेक लोक लठ्ठपणाशी झुंजत आहेत. लठ्ठपणामुळे तुमचे सौंदर्य तर कमी होतेच, पण त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला जिममध्ये न जाता किंवा महागड्या डाएट प्लॅनचे पालन न करता वजन कमी करायचे असेल, तर काही आयुर्वेदिक उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आयुर्वेदातील डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, आयुर्वेदात काही खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या खाद्यपदार्थांना 'मेदोहार' म्हणजेच चरबी कमी करणारे पदार्थ म्हणतात. हे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत, तर हार्मोनल संतुलन, इन्सुलिन संवेदनशीलता, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यात देखील मदत करतात.
View this post on Instagram
मध
आयुर्वेदानुसार चरबी कमी करणारा सर्वोत्तम पदार्थ म्हणजे मध. ते गोड असते पण शरीरासाठी पचायला सोपे आणि कफ कमी करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मध आणि कोमट पाण्यासोबत लिंबू घ्या.
आवळा
आवळा हे तिन्ही दोष (वात, पित्त, कफ) संतुलित करते आणि शरीराला सुखदायक आहे. हे लैंगिक इच्छा वाढवते आणि तरुण ठेवते. मधुमेह, केस गळणे आणि ऍसिडिटीमध्ये देखील फायदेशीर आहे. एक चमचा आवळा मधासोबत रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर एक तासाने घ्या.
वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स
हळद
हळद शरीराला शुद्ध करते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, कफ कमी होतो आणि मधुमेह नियंत्रित होतो. अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मध किंवा आवळा मिसळून रिकाम्या पोटी घ्या.
जव
जव चरबी कमी करण्यासाठी ओळखली जाते. हे शरीराला त्वरित पोषण प्रदान करते आणि वजन कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास, पचन, स्मरणशक्ती, आणि शारीरिक शक्ती सुधारण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी सात्विक जवाचे सेवन करा.
हेही वाचा>>>
Women Health : तुमची 'लाडकी लेक' वयात येणार! तिच्या पहिल्या मासिक पाळीसाठी 'असं' करा तयार, या गोष्टींबद्दल जरूर बोला
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )