Health: रणबीर कपूरला ज्या विचित्र आजाराने ग्रासलं, तो Nasal Septum म्हणजे काय? फार कमी लोकांना माहित, एका मुलाखतीत केला खुलासा
Ranbir Kapoor Nasal Septum: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला Nasal Deviated Septum नावाचा आजार आहे, हा आजार काय आहे आणि त्यावर उपचार काय आहेत? जाणून घ्या..
Nasal Septum: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचा वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. रणबीर त्याच्या उत्कृष्ट अभिनय शैलीमुळे तसेच चॉकलेट बॉय म्हणून जगप्रसिद्ध आहे. आजकाल आपण पाहतो अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकत्याच एका मुलाखतीत रणबीरनेही त्याच्या आजाराबद्दल खुलासा केला होता. अभिनेत्याने सांगितले होते की, त्याला लहानपणापासूनच एका धोकादायक आजाराचा सामना करावा लागला होता. रणबीरने सांगितले होते की, त्याला Nasal Deviated Septum म्हणजेच नाकाचा एक विचित्र आजार आहे. जाणून घेऊया हा आजार काय आहे? त्यावर उपचार काय आहेत?
रणबीर कपूरच्या या दुर्मिळ आजाराबद्दल जाणून घ्या..
बॉलिवूडचा सर्वात मोठा स्टार रणबीर कपूर लहानपणापासून नाकाच्या एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. या आजाराने त्याच्या अभिनय कारकिर्दीत कुठेतरी त्याचा परिणाम होत राहिला, परंतु फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. कपूर घराण्याच्या या लाडक्या मुलाला 'नेसल डिव्हिएटेड सेप्टम' नावाचा आजार होता, ज्यामुळे त्याच्या बोलण्याच्या आणि खाण्याच्या सवयींमध्ये खूप बदल झाला होता.
'नेसल डिव्हिएटेड सेप्टम' म्हणजे काय?
डिव्हिएटेड सेप्टम' ही नाकाच्या आतील भिंत किंवा पडद्याशी संबंधित समस्या आहे. नाकाच्या आत एक पातळ भिंत असते ज्याला सेप्टम म्हणतात, जे नाकातील भाग वेगळे करते. जेव्हा ही भिंत काही कारणास्तव एका बाजूला ढकलली जाते, तेव्हा त्याला डिव्हिएटेड सेप्टम म्हणतात. अशा स्थितीत नाकाचा रस्ता अरुंद किंवा बंद होऊ शकतो, ज्यामुळे नाकातील श्वासोश्वाच्छाच्या प्रवाहावर परिणाम होतो. या समस्येमुळे नाकात अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. तसेच, कधीकधी या स्थितीमुळे नाकातून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.
रणबीर कपूरने ही शस्त्रक्रिया टाळण्याचा निर्णय घेतला होता...
'नेसल डिव्हिएटेड सेप्टमवर सामान्यतः शस्त्रक्रियेने उपचार केले जातात, ज्याला 'सेप्टोप्लास्टी' म्हणतात. मात्र, रणबीर कपूरने ही शस्त्रक्रिया टाळण्याचा निर्णय घेतला होता. या आजाराचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे नाकातून श्वास घेण्यास त्रास होतो आणि कधीकधी या समस्येमुळे सायनसचा संसर्ग देखील होऊ शकतो. फिलाडेल्फियाच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या मते, ही समस्या जन्मजात असू शकते किंवा काही दुखापतीमुळे उद्भवू शकते. या स्थितीत, नाकाला दोन भागांमध्ये विभाजित करणारी भिंत असामान्य होते, ज्यामुळे शरीराच्या इतर भागावर परिणाम होतो.
या आजाराचे दुष्परिणाम काय आहेत?
'नेसल डिव्हिएटेड सेप्टमच्या प्रक्रियेशी निगडीत काही दुष्परिणाम असू शकतात, ज्यामध्ये फुगवटा दिसणे, डोळ्यांभोवती सूज येणे आणि थोड्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. या शस्त्रक्रियेचे परिणाम बऱ्याच काळानंतर स्पष्टपणे दिसतात, जे एक वर्षापेक्षा जास्त काळ स्पष्ट होऊ शकत नाहीत.
हेही वाचा>>>
Men Health: पुरुषांनो...तुमच्यातील व्हिटॅमिन्सची कमतरता 'अशी' दूर करा, अन्यथा शुक्राणूंवर होईल परिणाम
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )