Health : हे कसं शक्य आहे? जर जोडीदाराला असेल उच्च रक्तदाब, तर तुम्हीही 'या' आजारांना बळी पडू शकता? उत्तर जाणून घ्या..
Health : जर तुमच्या जोडीदाराला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्हीही त्याला बळी पडण्याची दाट शक्यता आहे. हे कसे शक्य आहे? याबद्दल माहिती जाणून घ्या..
Health : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. कोणाला मधुमेह..कोणाला..रक्तदाब.. कोणाला लठ्ठपणा अशा विविध आजारांचे लोक बळी पडत आहेत. यापैकी उच्च रक्तदाबाचे रुग्ण आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबात दिसून येतात. आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या केवळ प्रौढ व्यक्तींनाच नव्हे तर तरुणही मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. तसं पाहायला गेलं तर, उच्च रक्तदाबाची समस्या ही संसर्गजन्य नाही, परंतु तरीही जर तुमच्या जोडीदाराला ही समस्या असेल तर तुम्हीही विविध आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे. उच्च रक्तदाब हा खराब जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे आणि जर तुमचा जोडीदार निरोगी जीवनशैलीचे पालन करत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही दिसू शकतो. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल तर जाणून घ्या...
तरुण वयातच या आजाराला बळी पडतायत
उच्च रक्तदाब ही एक धोकादायक स्थिती आहे, जी तुमच्या हृदयाला थेट हानी पोहोचवू शकते. ज्यामध्ये शरीरातील रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब खूप वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात. उच्च रक्तदाबामुळेही किडनीचा आजार होऊ शकतो. पूर्वी हा आजार वाढत्या वयाबरोबर होत होता, तर आता तरुण वयातच या आजाराला बळी पडत आहेत. अस्वस्थ जीवनशैली आणि आहार यामुळे हा आजार होतो. पूर्णपणे बरा होणे शक्य नाही, पण जीवनशैली आणि आहारात आवश्यक बदल करून रक्तदाब बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवता येतो. हाय बीपी बद्दल आणखी एक गोष्ट तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे, ती म्हणजे जर तुमच्या जोडीदाराला ही समस्या असेल तर तुम्हीही त्याला बळी पडण्याची दाट शक्यता आहे. हे कसे शक्य आहे? याबद्दल माहिती जाणून घ्या..
टेन्शन (तणाव)
जर तुमचा जोडीदार उच्च रक्तदाबाचा रुग्ण असेल आणि तुम्ही त्याच्या आरोग्याबद्दल, खराब जीवनशैलीबद्दल आणि आहाराबद्दल तणावग्रस्त असाल तर तुम्ही देखील तणावाचे रुग्ण होऊ शकता. तणाव हे उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण आहे.
अयोग्य सवयी
तुमच्या जोडीदारासोबत राहत असताना, काहीवेळा तुम्ही तुमच्या आरोग्यावर योग्य लक्ष केंद्रित करू शकत नाही. ना खाण्यावर, ना झोपण्यावर किंवा व्यायामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब असण्याची शक्यता लक्षणीय वाढते.
झोपेचा अभाव
जर तुमचा जोडीदार कोणत्याही आरोग्याच्या समस्येने त्रस्त असेल, तर त्याची झोपच नाही तर तुमचीही झोप उडू शकते आणि त्यामुळे रक्तदाबाचा धोका वाढतो.
असे निरोगी रहा
सकाळी किंवा संध्याकाळी एकत्र व्यायाम करण्याची योजना बनवा, ज्यामुळे तुम्हा दोघांना प्रेरणा मिळेल.
सकस आणि संतुलित आहार घ्या.
शांत झोपेसाठी, गॅझेट्सपासून अंतर आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम यासारखे पर्याय वापरून पाहा.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )