एक्स्प्लोर

Health : काय मंडळी.. तासन्-तास इअरफोन कानाला लावताय? आताच सावध व्हा..! 5 नुकसान जाणून घ्या 

Health : काही लोक कधी बाहेरचा आवाज टाळण्यासाठी किंवा कधी फक्त स्टाईलसाठी कानात इअरफोन वापरतात, पण डॉक्टर्स तुम्हाला वेळीच सावध होण्याचा इशारा देत आहेत.

Health : आवडती गाणी असो.. किंवा मीटींग.. किंवा कोणाचा फोन आला तर काही जणांना सवय असते कानाला तासन्-तास इअरफोन लावून बसायचे. पण तुम्हाला माहित आहे का? याचे तुमच्या आरोग्यासाठी किती दुष्परिणाम आहेत. आजकाल प्रत्येकाने इअरफोनला आपला साथीदार बनवले आहे. काही जणांना सवय असते, ती म्हणजे कधी बाहेरचा आवाज टाळण्यासाठी किंवा कधी फक्त स्टाईलसाठी कानात इअरफोन वापरतो. त्या लोकांना कदाचित माहित नसेल, पण डॉक्टर्स तुम्हाला वेळीच सावध होण्याचा इशारा देत आहेत. कारण यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. कानाच्या संसर्गासारखे अनेक नुकसान होऊ शकतात. हे एखाद्या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता देखील कमी करू शकते.


जास्त वेळ इअरफोन लावल्याने आरोग्याचे नुकसान

घर असो किंवा ऑफिस, आजकाल सगळीकडे लोक कानात इअरफोन घातलेले दिसतात. कधी चित्रपट पाहताना किंवा कधी प्रवासात गाणी ऐकताना इअरफोनचा वापर पूर्वीपेक्षा वाढला आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की तासन्तास इअरफोन लावल्याने कानाला इजा होऊ शकते. जास्त वेळ इअरफोन लावल्याने डोकेदुखी, कान दुखणे आणि कान सुन्न होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. इअरफोन घातल्याने होणारा त्रास सहन करण्याऐवजी त्याचे तोटे जाणून घेणे अधिक चांगले. हेडफोन घातल्याने तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते ते जाणून घ्या


इअरफोनच्या वापरामुळे हे नुकसान होऊ शकते

 

मानसिक आरोग्यावर परिणाम

जास्त जोरात इअरफोन लावल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि कान खराब होतात. यांचा अतिवापर केल्याने तुमची ऐकण्याची क्षमताही कमी होऊ शकते.

 

कानाला संसर्ग होऊ शकतो

जास्त वेळ हेडफोन घातल्याने कानाच्या आतील रक्तप्रवाहात बदल होऊ शकतो, ज्यामुळे कानाला इजा होऊ शकते. हेडफोन वापरणे, विशेषत: उच्च आवाजात, कानाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.

 

कान दुखणे आणि सूज येणे

जर हेडफोन्सचे पॅडिंग किंवा डिझाइन योग्य नसेल आणि ते तुमच्या कानात व्यवस्थित बसत नसतील, तर ते जास्त वेळ वापरल्याने कानात दुखणे आणि सूज येऊ शकते.

 

श्रवण कमतरता

जास्त आवाजामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन कानांच्या नसा कालांतराने खराब होऊ शकतात. त्यामुळे कमीत कमी इअरफोनचा वापर करावा.

 

डोकेदुखीचे कारण असू शकते

तासनतास इअरफोन लावून आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो.

 

हेही वाचा>>>

Health : 'गरम-गरम वरण-भात.. त्यावर तुपाची धार..' सर्वगुण संपन्न पदार्थाचे आरोग्यासाठी फायदे जाणून व्हाल थक्क

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget