(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health : सावधान! तोंडातून किंवा गुदाशयातून शरीरात प्रवेश करतो 'हा' विषाणू, पावसाळ्यात वाढतो धोका, डॉक्टर सांगतात...
Health : आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यातील एका अशा आजाराबद्दल सांगणार, जो एक गंभीर संसर्ग आहे. याचा विषाणू सामान्यतः गुदाशय किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करतो.
Health : पावसाळ्यात एकीकडे आल्दाददायक वातावरणामुळे मन प्रसन्न होते, तर दुसरीकडे याच पावसाळ्यात येणारे अनेक आजार लोकांसाठी त्रासाचे कारण बनतात. या काळात पाणी, अन्न आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांची भीती असते. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यातील एका अशा आजाराबद्दल सांगणार, जो एक गंभीर संसर्ग आहे. याचा विषाणू सामान्यतः गुदाशय किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करतो. जी अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत डॉक्टर काय सांगतात? जाणून घ्या...
दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग
पावसाळ्यात हिपॅटायटीस आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. हा दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे जो गुदाशय किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करतो. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा केला जातो. हिपॅटायटीस ए आणि ई यासह अनेक प्रकार आहेत, जे अन्न आणि जलस्रोतांच्या दूषिततेमुळे होतात, ही सध्याची एक मोठी चिंता आहे.
सध्याची एक मोठी चिंता
हिपॅटायटीस या गंभीर संसर्गाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटीस दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हायरल हेपेटायटीस दूर करण्यासाठी जनजागृती करणे हा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. त्यामुळेच आज या लेखात आम्ही तुम्हाला हिपॅटायटीस टाळण्यासाठी न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स, नोएडा येथील पॅथॉलॉजिस्ट सल्लागार डॉ. विज्ञान मिश्रा यांनी दिलेल्या काही टिप्स सांगणार आहोत...
स्वच्छ पाणी प्या
पावसाळ्यात जलप्रदूषण ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे हिपॅटायटीस होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्यावे. घरी वॉटर प्युरिफायर वापरा आणि कोठूनही पाणी पिणे टाळा. याशिवाय प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.
हाताची स्वच्छता राखणे
हिपॅटायटीस, विशेषतः हिपॅटायटीस ए आणि ई, जे फेटो-ओरल मार्गाने पसरतात, हे टाळण्यासाठी हाताची स्वच्छता महत्वाची आहे. यासाठी, खाण्यापूर्वी, शौचालय वापरल्यानंतर आणि संभाव्य दूषित पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यानंतर आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा.
स्वच्छ आणि ताजे अन्न खा
दूषित होण्याची शक्यता वाढल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील अन्न आणि कच्चे खाद्यपदार्थ खाणे विशेषतः धोकादायक ठरू शकते. म्हणून, सुरक्षित राहण्यासाठी, ताजे आणि शिजवलेले अन्न निवडा. कच्चे सॅलड खाणे टाळा आणि फळे आणि भाज्या व्यवस्थित धुतल्या आहेत किंवा सोलल्या आहेत याची खात्री करा.
पूरग्रस्त भाग टाळा
पावसाळ्यात, पुराच्या पाण्यात जाणे टाळा, कारण त्यात हिपॅटायटीसचे विषाणू असू शकतात. तुम्ही पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलात तरीही, नंतर तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वच्छ केल्याची खात्री करा. संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याही खुल्या जखमांवर ताबडतोब उपचार करा.
टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावा
हिपॅटायटीसचा प्रसार रोखण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या टाकाऊ वस्तूंची, विशेषतः मानवी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. सांडपाणी व्यवस्था योग्यरितीने काम करत असल्याची खात्री करा आणि चांगल्या विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. तसेच स्वच्छतेच्या योग्य सुविधांचा वापर करा आणि उघड्यावर शौच करू नका.
लसीकरण करा
विशिष्ट प्रकारचे हिपॅटायटीस टाळण्यासाठी लसीकरण हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. हिपॅटायटीस ए आणि बी लस घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा>>>
Health : मंडळीनो सावधान! Dengue तुमच्या मेंदू अन् मज्जासंस्थेवरही हल्ला करू शकतो, डॉक्टरांकडून जाणून घ्या गंभीर परिणाम
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )