एक्स्प्लोर

Health: सावधान..खाद्यपदार्थ कागदामध्ये गुंडाळताय? कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण, आरोग्य तज्ज्ञ सांगतात..

Health: आपण अनेकदा पाहतो, विविध खाद्यपदार्थ हे सर्रासपणे वर्तमानपत्र, प्लास्टिक, ॲल्युमिनीयम, फॉईलमध्ये गुंडाळले जातात. मग तुम्ही कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण देताय. जाणून घ्या

Health: आपण अनेकदा पाहतो, शाळेतील तसेच ऑफ़िसच्या डब्यातील पदार्थ, चपात्या, रस्त्यावरील खाद्य पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्र, प्लास्टिक, ॲल्युमिनीयम, फॉईलमध्ये गुंडाळले जातात. त्याचा खाद्यपदार्थांवर काय परिणाम होतो तसेच त्याहून अधिक आपल्या आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतो, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते, तुम्हाला कदाचित माहित नसेल पण यामुळे कळत-नकळत आपण कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण देतो. या संदर्भातील माहिती फुड अथॉरिटीने दिली आहे. जाणून घ्या सविस्तर..

कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण?

खाद्यपदार्थ वृत्तपत्रात बांधले जातात खरे.. मात्र शाईमध्ये अतिशय घातक असे केमिकल असतात. जे बायोएक्टिव्ह असल्याने आपल्या शरीरात गेल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्रिंटिंगच्या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा वेळी कागदात अन्न बांधून ठेवल्यास ते रसायन अन्नाच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.  FSSAI भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कागदावर जीवाणू, विषाणू देखील मोठ्या प्रमाणात असतात. हे जीवाणू, विषाणू अन्नात जाऊन त्या आहाराचा तुमच्या आरोग्यावर गंभीर आजार होऊ शकतो. खास करुन पोटाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण होतो. 

संशोधनात काय म्हटलंय?

अनेकदा डब्यात दिली जाणारी चपाती, सॅंडविच, तसेच रस्त्यावरील पदार्थ पॅक करण्यासाठी प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यातूनही घात रसायनं अन्नामध्ये उरतात, त्यामुळे यातील आरोग्याला हानी पोहोचू शकते.  इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स यामध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, अ‍ॅल्युमिनियम फॉइलमधून वेगवेगळ्या उत्तेजकांमध्ये, विशेषतः डिस्टिल्ड वॉटरमध्ये तसेच अम्लीय आणि अल्कधर्मी द्रावणात बाहेर पडतात. अन्नात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणून त्यातील पदार्थ खाणे टाळले पाहिजे. 

शरीरावर नकारात्मक परिणाम 

वर्तमान पत्रात बांधलेले खाद्यपदार्थ खाणे अनेक प्रकारे जीवघेणं ठरू शकतं. कारण वर्तमानपत्रातील शाईमध्ये मल्टिपल बायोअॅक्टिव मटेरिअल असते. ज्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. ही शाई शरीरात गेल्यावर कॅन्सरसह इतरही जीवघेणे आजार बळावू शकतात अशी माहिती फुड अथॉरिटीने दिली आहे. आपण आपल्या दैनंदिन दिनचर्यात बहुतांश वेळा पॅकेज केलेले अन्नाचा वापर करतो आणि त्यामुळे सुरक्षित, ताजे व गरम अन्नाचे सेवन करता येते म्हणून ते चांगले, असा भ्रम आपल्या मनात असतो. परंतु ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण बहुतांश खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये प्लास्टिकचे घटक आणि घातक रसायने वापरलेली असतात, जे अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि कर्करोगासारख्या इतर अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात. वर्तमानपत्रे हे अन्न पदार्थ पॅकेजिंग म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली नाहीत. त्यांचे उत्पादन आणि हाताळणी फूड-ग्रेड पॅकेजिंग मटेरियल्समाणेच स्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे पालन करत नाहीत. त्यामुळे, त्यांचा वापर करणं म्हणजे आरोग्याला धोका निर्माण करणं होय.

आरोग्य तज्ज्ञ सांगतात...

तळेगाव येथील रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ ज्योती मेहता सांगतात की, रस्त्यावरच्या गाड्यांवर विकले जाणारे खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून ग्राहकांना दिले जातात. वडापाव, भजी, समोसे, भेळ हे खाद्यपदार्थ पेपरमध्ये बांधून विकले जातात. पण वर्तमानपत्रासाठी वापरण्यात येणारी शाई पोटात गेल्यास आरोग्याला धोकादायक ठरू शकते. पेपरची शाई, त्यातील रसायने सतत पोटात गेल्यास विविध आजारांना आमंत्रण दिले जाते. 

हेही वाचा>>>

Women Health: महिलांनो सावध व्हा.. पोटाची चरबी ठरतेय अत्यंत धोकादायक? विविध गंभीर आजारांना आमंत्रण? सद्गुरूंनी सांगितले कारण आणि उपाय

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget