एक्स्प्लोर

Women Health: महिलांनो सावध व्हा.. पोटाची चरबी ठरतेय अत्यंत धोकादायक? विविध गंभीर आजारांना आमंत्रण? सद्गुरूंनी सांगितले कारण आणि उपाय

Women Health: वजन वाढणे स्त्रियांसाठी धोकादायक ठरू शकते, विशेषतः पोटावर चरबी असणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. सद्गुरूंकडून कारणे आणि ते टाळण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या.

Women Health: अनेकदा आपण पाहतो, आजकालची स्त्री ही केवळ चूल-मूल पर्यंत मर्यादित न राहता स्वत:चं करिअरही घडवू लागली आहे. कारण आजच्या महागाईच्या युगात कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलांचे संगोपन सामान्य कुटुंबातील केवळ एकट्या पुरूषाने करणे शक्य होत नाही, अनेक महिला एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडताना आपल्याला दिसतात. या सर्व गडबडीत त्या आपल्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष करतानाही दिसतात. ज्यामुळे त्या विविध गंभीर आजारांना ग्रासल्या जातात. त्यापैकी लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे, जी आता जागतिक होत आहे. आजकाल हा आजार एवढा वाढू लागला आहे की सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होत आहे. लहान मुलांसह स्त्री-पुरुष प्रत्येकजण लठ्ठपणाने त्रस्त आहे. महिलांमध्ये ही समस्या गंभीर असू शकते, विशेषतः पोटाची चरबी त्यांच्यासाठी धोकादायक आहे. सद्गुरु म्हणतात की, स्त्रियांच्या पोटावर चरबी असणे चांगले नाही. सद्गुरु म्हणून ओळखले जाणारे जगदीश वासुदेव यांनी महिलांसाठी पोटाची चरबी का धोकादायक आहे? ती कशी कमी करता येईल? याबाबत सांगितले आहे. जाणून घेऊया...

ती नक्कीच तिच्या आयुष्यात रोगांना आमंत्रण देतेय..

सद्गुरु म्हणतात की, लठ्ठपणाची समस्या, जी सामान्यतः पोटाची चरबी असते, स्त्रियांमध्ये, विशेषत: भारतातील स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. जीवनशैली, गर्भधारणेनंतर पोट फुगणे आणि अनुवांशिक समस्यांसह याची अनेक कारणे असू शकतात. सद्गुरु स्पष्ट करतात की जर एखादी तरुणी अशा समस्येशी झुंज देत असेल तर ती नक्कीच तिच्या आयुष्यात रोगांना आमंत्रण देत आहे.

पोटाची चरबी धोकादायक का आहे?

  • सद्गुरू सांगतात की स्त्रियांच्या पोटातील चरबीमुळे हार्मोनल असंतुलन होते. 
  • हार्मोनल असंतुलनामुळे PCOS होतो, जो स्त्रियांमध्ये सामान्य आहे.
  • पोटाभोवती चरबी वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • याशिवाय महिलांमध्ये प्रजनन समस्या वाढण्यामागे पोटाची चरबी हे सर्वात मोठे कारण आहे. 
  • यामध्ये गर्भधारणेच्या समस्या, लघवीच्या समस्या, मासिक पाळीच्या समस्या आणि मधुमेह यांचाही समावेश होतो.

कसे कमी कराल?

सद्गुरु म्हणतात की, स्त्रियांनी प्रथम हे जाणून घेतले पाहिजे की शारीरिक क्रिया सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे पोटाची चरबी कमी करण्यासाठी त्यांनी दिवसभर काही ना काही काम करून शरीर सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते दिवसभर चालणे किंवा जॉगिंग करू शकतात किंवा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस व्यायाम करू शकता. सद्गुरूंनी महिलांना हठयोग करण्याचा सल्ला दिला आहे. हठयोग केल्याने त्यांच्या शरीरालाही चपळता येते. तुम्ही ही पद्धत रोज पाळल्यास हार्मोनल संतुलनही नियंत्रित राहते.

हठयोगाचे फायदे

  • हे योग आसन केल्याने मानसिक आणि शारीरिक शांती मिळते.
  • हठयोग केल्याने आपले शरीर लवचिक बनते आणि वजन नियंत्रणात राहते.
  • हठयोग केल्याने पाठीचा कणाही मजबूत होतो.

हेही वाचा>>>

Cancer: सावधान! झोपताना आढळते कॅन्सरचे 'हे' लक्षण! अनेकांना माहित नाही, आरोग्य तज्ज्ञ सांगतात... 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
Embed widget