Health : काय सांगता! हेडफोन्समुळे 100 कोटी तरुण बहिरे होणार? WHO चा धक्कादायक खुलासा, रिपोर्टमध्ये नेमकं म्हटलंय तरी काय?
Health : जर तुम्हाला म्हटलं की, येत्या काही वर्षात तुम्हाला ऐकायला येणं बंद होईल, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या एका अहवालात म्हटलंय...
Health : आजकाल रस्त्यावर, रेल्वे स्थानकावर, कॉलेजेस, शाळा, ऑफिस , मॉल्स, आपण अनेकदा पाहतो की, बरेच लोक कानात हेडफोन्स लावून फिरत असतात. बाजारात विविध कंपनींची विविध आधुनिक शैलीचे हेडफोन्स उपलब्ध आहेत. पूर्वी असे हेडफोन्स, वृद्ध लोकांच्या कानात दिसत होते, कारण त्यांना ऐकायला कमी येत होते, परंतु आज ही एक फॅशन झाली आहे. आता ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे, तो गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरतो, पण त्याच्यासाठी ते किती धोकादायक आहे हे त्याला कदाचित माहीतच नाही. जर तुम्हाला म्हटलं की, येत्या काही वर्षात तुम्हाला ऐकायला येणं बंद होईल, तर हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या एका अहवालात म्हटलंय की, 2050 पर्यंत जगातील सुमारे 100 कोटी लोक बहिरे होतील आणि त्यांचे वय 12 ते 35 वर्षांच्या दरम्यान असेल. नेमकं काय म्हटलंय या रिपोर्टमध्ये? जाणून घ्या...
WHO च्या अहवालात धक्कादायक खुलासा
जेव्हा आपण हेडफोन वापरतो, तेव्हा कदाचित आपण त्याच्या दुष्परिणामांचा विचार करत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, हेडफोन, इअरफोन आणि इअरबड्सचा आपल्या आरोग्यावर खोल परिणाम होत चालला आहे. फॅशन म्हणा किंवा छंद म्हणा, या हेडफोनचा वापर भविष्यातील संपूर्ण पिढी बहिरी करेल. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, 2050 पर्यंत जगातील सुमारे 100 कोटी लोक बहिरे होतील आणि त्यांचे वय 12 ते 35 वर्षांच्या दरम्यान असेल. हेडफोन-इयरफोनमुळे दर चारपैकी एक व्यक्ती बहिरा होईल, असे अहवालात म्हटले आहे.
25% लोक हेडफोन-इयरफोनमुळे बहिरेपणाचा धोका पत्करतात
WHO च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्या 12 ते 35 वर्षे वयोगटातील सुमारे 50 कोटी लोक विविध कारणांमुळे बहिरेपणाच्या विळख्यात आहेत. यापैकी 25% लोक सतत इअरफोन, इअरबड्स किंवा हेडफोनवर मोठ्या आवाजात काहीतरी ऐकत असतात. सुमारे 50% लोक मोठ्या आवाजातील संगीत, क्लब, डिस्कोथेक, सिनेमा, फिटनेस क्लास, बार किंवा इतर कोणत्याही मोठ्या आवाजाच्या दीर्घकाळामुळे बहिरे होत आहेत.
हेडफोनचा कोणता आवाज सुरक्षित आहे?
कोणत्याही वैयक्तिक उपकरणांमधील आवाज पातळी 75 डेसिबल (db) ते 136 डेसिबल पर्यंत असते,
जरी ही पातळी वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न असू शकते.
त्यामुळे याचा सरासरी, आवाज 75db ते 105db दरम्यान असावा.
सामान्यतः ऍपल वॉच जेव्हा dB 90 पेक्षा जास्त असेल, तेव्हा ॲलर्ट जारी करते.
कानांसाठी सर्वात सुरक्षित व्हॉल्यूम 20-30db आहे.
हेही वाचा:
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )