एक्स्प्लोर

Kurla Bus Accident: नोकरीचा पहिला दिवस अन् घरी परतताना घात झाला, कुर्ल्यातील बस अपघातात आफरिन शाहने जीव गमावला

Kurla BEST Bus Accident: कुर्ला बस अपघातात चालक संजय मोरेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

मुंबई: मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. बेस्ट बस कुर्ला येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत शिरली. या अपघातात अनेकजण चिरडले गेले. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू झाल असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून बेस्ट प्रशासन आणि कंत्राटी कर्मचारी याबाबत अनेक प्रश्न नव्याने ऐरणीवर आले आहेत.

दरम्यान, कालच्या दुर्घटनेत बेस्ट बसमुळे चिरडल्या जाणाऱ्यांमध्ये आफरिन शहा या 19 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. आफरिन हिचा सोमवारी नोकरीचा पहिला दिवस होता. ती कामावरुन घरी परतत असताना बेस्टच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. तर कनीज फातिमा या महिलेचाही अपघातात मृत्यू झाला. त्या एका रुग्णालयात नोकरी करायच्या. काल अपघात घडला तेव्हा फातिमा या रुग्णालयात नाईट ड्युटीसाठी निघाल्या होत्या. ही सगळी माहिती समोर आल्यानंतर नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.  

अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावे

कनीज अन्सारी (वय 55)
आफरिन शहा (वय 19)
अनम शेख (वय 20)
शिवसम कश्यप (वय 18)
विजय गायकवाड (वय 70)
फारुख चौधरी (वय 54)
कनीज़ फातिमा

बेस्ट बस तयार करणाऱ्या कंपनीवर  कारवाई होणार?

कुर्ला बस अपघातानंतर संबंधित बेस्ट बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, अशी चर्चा सुरु झाली आहे. बेस्ट प्रशासनाने बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. मात्र, याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बस तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. 

कुर्ला घटनेतील बस जर सदोष असेल तर त्या कंपनीवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सहापेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये मदत सरकारने केली आहे. राज्यात आशा घटना घडू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. कंत्राटी किंवा अर्ध शिक्षित व्यक्तीला बस चालवायला कोणी दिली. त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. सदोष वाहन तयार करणे हे हा गुन्हा आहे. आपण कोणत्याही कंपनीचा उल्लेख करणं योग्य नाही. दोषपूर्ण वाहन तयार केल असेल तर चुकीच आहे. संबंधित कंपनीला सहआरोपी करावं. कंपनीचा मालक कोणीही असला तरी कारवाई झाली पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी या भयानक घटनेबाबत माहिती दिली. प्रत्यक्षदर्शी कपिल सिंग यांनी सांगितले की, कुर्ला ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी मार्ग क्रमांक 332 ची बेस्ट बस पूर्णपणे भरली होती. बसने प्रथम ऑटोरिक्षाला धडक दिली आणि नंतर एकामागून एक वाहनांना धडक दिली आणि आंबेडकर कॉलनी गेटवर धडकल्यानंतर ही बस थांबली. या घटनेत बसने अनेक पादचारी आणि फेरीवाल्यांना धडक दिली. नेमकं काय घडतंय हे कळण्याच्या आता हे सारं घडलं. लोकांना धक्का बसला होता. ते एखाद्या दहशतवादी हल्ल्यासारखं दिसत होतं. संतप्त जमावाने बसचा पाठलाग करून चालकाला पकडले आणि पोलिस येईपर्यंत त्याला बेदम मारहाण केली, असे कपिल सिंग यांनी सांगितले.

आणखी वाचा

 स्टिअरिंग गरागरा फिरवायची सवय असणाऱ्या संजय मोरेंच्या हातात इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टेअरिंग आलं अन् घात झाला?

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Embed widget