Health Care Tips : जाणून घ्या हिवाळ्यात 'मध' खाण्याचे फायदे
Health Care Tips : मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधामुळे शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.
Health Care Tips : मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा वापर करून अनेक पदार्थ बनवता येतात. नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वाढवतेदेखील.
- मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण होते.
- कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा मधामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यास आराम मिळतो.
- उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.
- हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.
- दररोज मध खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मधामुळे शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.
- पिंपल्स दूर करण्यासाठी मध उपयोगी आहे. गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्याचा फायदा होतो.
- उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.
- पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करता येते.
- चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बेसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल.
- रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.
- टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचनाचा त्रास दूर होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Blood Sugar Control: मधुमेह नियंत्रणासाठी या फळांचा आणि पालेभाज्यांचा करा आहारात समावेश
लांबसडक केस हवेत? तर कमी पैशांमध्ये घरच्या घरी हे उपाय करुन बघाच...
Health Tips: झटपट वजन कमी करायचंय? 'या' फळांचा करा आहारात समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )