Health Tips : फ्रीजमध्ये कोणते पदार्थ किती वेळ ठेवावेत? जास्त दिवस ठेवणं आरोग्यासाठी हानिकारक
फळे, भाज्या, दूध, दही, अंडी आणि पाणी इत्यादी सामान अनेक लोक फ्रीजमध्ये ठेवत असतात. अनेक पदार्थ फ्रीजमध्ये स्टोअर केले जातात.
Health Care Tips : फळे, भाज्या, दूध, दही, अंडी आणि पाणी इत्यादी सामान अनेक लोक फ्रीजमध्ये ठेवत असतात. अनेक पदार्थ फ्रीजमध्ये स्टोअर केले जातात. फ्रीजमध्ये अन्न ठेवल्याने ते जास्त दिवस फ्रेश राहते. पण तुम्ही जर फ्रीजमध्ये खूप दिवस अन्न ठेवले तर ते खराब हेऊ शकते. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न आपण किती तासानंतरही खाऊ शकतो आणि कोणता पदार्थ किती वेळ फ्रीजमध्ये ठेवून आपण वापरू शकतो हे जाणून घेऊयात.
फ्रीजमध्ये कोणते पदार्थ किती वेळ ठेवावे?
फ्रीजमध्ये ठेवलेला भात 2 दिवसात खाऊन घ्यावा, अन्यथा तो खराब होतो. फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवलेला भात खाल्याने पोट दुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही गव्हाची चपाती फ्रीजमध्ये ठेवत असाल तर चपाती बनवल्यानंतर 12 ते 14 तासांच्या आत खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. फ्रीज ठेवलेली कापलेली फळे 4 तासांच्या आत खावीत. केळी हे असे फळ आहे की तुम्ही ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते. डाळ फ्रीज ठेवली असेल तर तुम्ही ती डाळ 2 दिवसांच्या आत खावी. कारण फ्रीजमध्ये 2 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवलेली डाळ खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो.
काही लोक कच्च आणि शिजवलेले पदार्थ फ्रीजमध्ये एकत्र ठेवतात. त्यामुळे दोन्ही पदार्थ खराब होऊ शकतात. शिळे आणि ताजे जेवण एकत्र फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीजमध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. त्यामुळे फ्रीजमध्ये हे पदार्थ वेगवगेळ्या ठिकाणी झाकून ठेवावेत.
टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
Fridge Cleaning Tips : फळं आणि भाज्या ठेवण्याआधी असा स्वच्छ करा फ्रीज; बॅक्टेरिया होतील दूर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )