Health Care Tips : आरोग्यदायी गुळाची चिक्की, जाणून घ्या फायदे...
Health Care Tips : भारतात गुळाची चिक्की ही प्रसिद्ध मिठाई आहे. गुळाची चिक्की आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
Health Care Tips : देशात हिवाळ्यात (Winter) हमखास बनवल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक म्हणजे गुळाची चिक्की. भारतात गुळाची चिक्की ही प्रसिद्ध मिठाई आहे. यामध्ये गुळ आणि शेंगदाण्याचा वापर केला जातो. बहुतेक जण गुळाची चिक्की उपवासाला खातात. मात्र या व्यतिरिक्त गुळाची चिक्की तुमच्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे ठाऊक आहे का? नसेल तर जाणून घ्या...
त्वचेच्या समस्या दूर करते
हिवाळ्यात त्वचेमध्ये बदलाव येतो यामुळे त्वचेच्या समस्या जाणवू लागतात. अशावेळी त्वचेला आतून पोषण मिळण्याची गरज असते. तर चिक्कीमध्ये अनेक दाहक-विरोधी गुणधर्म आहेत ज्या त्वचेच्या समस्या दूर करते. चिक्कीमध्ये शेंगदाणा आणि गुळ असल्यामुळे हे पोषकत्तव ई, झिंक यांचा उत्तम स्रोत आहे.
मज्जासंस्था मजबूत करते
आपला मेंदू हे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्याचे काम करते. चिक्कीमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोफेनॉल आढळतात, जे अल्झायमरसारख्या सामान्य मेंदूच्या समस्यांशी लढण्यास मदत करतात. त्याच वेळी, ते तुमची मज्जासंस्था देखील मजबूत करते.
आरोग्यासाठी उत्तम
हिवाळा येताच व्यायामासारख्या शारीरिक हालचाली खूप कमी होतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याच्या विकासावर परिणाम होतो. गूळ आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर अमिनो अॅसिड आढळते, जे आपल्या शरीराच्या विकासात मदत करते. त्यामुळे हिवाळ्यात गुळाची चिक्की जरूर खावी. असे केल्याने तुमचे शरीरही निरोगी राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
- The Kapil Sharma Show : 'मुंबईत राहतो आणि मराठी बोलत नाही'; सोनालीने कपिलला सुनावलं
- जीन्सवर ही छोटी बटणं का असतात? माहितीय का...
- अजित दादांचा स्वॅगच लय भारी, विकी कौशलचं स्टारडमही पडलं फिकं, पाहा व्हिडीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )