Health Care And Fitness Tips: चेहऱ्यावरील चरबी कमी करायचीये? ट्राय करा हा फेशियल योगा
चेहऱ्यावरील चरबीकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात.पण या चरबीकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला डबल चिनची सारख्या समस्या जाणवू शकतात.
Facial Yoga: वजन जास्त असेल तर अनेक लोक डाएट प्लॅन करतात. तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. चेहऱ्यावरील चरबीकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. चेहऱ्यावर दिसणारी चरबी म्हणजेच फेस फॅटमुळे डबल चिनची समस्या जाणवू शकते. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी कोणतेही डाएट करण्याची किंवा जिम लावण्याची गरज नाही. घरच्या घरीच तुम्ही फेशियल योगा करून चेहऱ्यावरील चरबी घालवू शकता.
काय आहे फेशियल योगा
फेशियल योगा हा चेहऱ्याचा मसाज आणि व्यायमाचा प्राकार आहे. हा योगा केल्याने चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचा उत्तेजित होते. तसेच या योगाने तणाव आणि चिंता कमी होतात.चेहऱ्याचे स्नायू मऊ देखील होतात. काही संशोधनामधून असे स्पष्ट झाले आहे की, फेशियल योगामुळे त्वाचा उजळ होते. फेशियल योगाचे अनेक मानसिक आणि शारिरीक फायदे आहेत.
Weight Loss Tips : झटपट वजन कमी करायचंय? मग 'या' 10 टिप्स तुमच्यासाठीच
फेशियल योगाचे प्रकार-
फिश पोज- फेशियल योगाचा हा प्रकार अगदी सोपा आहे. गालांना आतल्या बाजूला खेचून माश्यासारखा चेहरा करावा. हा फेशियल योगा केल्याने चेहऱ्यावरील एक्स्ट्रा फॅट कमी होईल. तसेच चेहऱ्यावरील सुर्कुत्या देखील कमी होण्यास मदत होईल.
बलून पोज- बलून पोजमध्ये तोंडामध्ये हवा भरून 10 सेकंद श्वास थांबवून ठेवा. त्यानंतर तोंडातील हवा उजव्या आणि डाव्या बाजूला फिरवा. असे तुम्हाला 5 वेळा करावे लागेल. हा फेशियल योगाचा प्रकार केल्याने चेहऱ्यावर चरबी जमा होत नाही. तसेच याने तोंडाच्या जबड्याची हडे मजबूत होतात.
लायन पोज- जिभेला तोंडाच्या बाहेर काढून तोंड बंद करावे. त्यानंतर. तोंडामधील हवा उजव्या आणि डाव्या बाजूला फिरवावी. यामुळे चेहऱ्याची सैल झालेली स्किन घट्ट होते.
Health Tips: जर तुम्हाला 30 मिनिटात 500 कॅलरीज बर्न करायची असतील तर हे 5 व्यायाम करा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )