Health Benefits of Poha: सकाळच्या नाश्त्याला भात खाऊ नका, त्याऐवजी पोहे खा; आरोग्यासाठी फायदेच फायदे!
Healthy Diet Poha : अनेक आहारतज्ज्ञांच्या मते, नाश्त्यासाठी जर कोणता पदार्थ सर्वोत्त ठरत असेल, तर तो म्हणजे, पोहे. नाश्त्यासाठी पोहे खाणं हे भातापेक्षा उत्तम मानलं जातं.
![Health Benefits of Poha: सकाळच्या नाश्त्याला भात खाऊ नका, त्याऐवजी पोहे खा; आरोग्यासाठी फायदेच फायदे! health benefits of poha in breakfast diet nutrition healthy diet benefits of having poha in morning breakfast Know All details Health Benefits of Poha: सकाळच्या नाश्त्याला भात खाऊ नका, त्याऐवजी पोहे खा; आरोग्यासाठी फायदेच फायदे!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/17fd67bd260bd5544aa9b17c54aac26f1697692642101658_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Benefits of Poha: भारतीय खाद्यसंस्कृती (Indian Food Culture) आणि तिची ख्याती संपूर्ण जगभरात पसरली आहे. जगभरातून अनेकजण वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी भारतात येतात. भारतात प्रत्येक व्यक्तीच्या खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. घराघरांमध्ये नाश्त्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्येही फार वेगळेपणा दिसतो. काही घरांमध्ये नाश्त्यासाठी (Breakfast Diet Nutrition) इडली, डोसा केला जातो. तर काही घरांमध्ये उपमा, पराठा किंवा भात तयार केला जातो. तर काही घरांमध्ये पोहे (Healthy Diet Poha) केले जातात. तुम्ही तुमच्या चवीनुसार नाश्ताचा पर्याय निवडत असलात, तरी तुमच्या आरोग्याकडे (Healthy Lifestyle) दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं.
अनेक आहारतज्ज्ञांच्या मते, नाश्त्यासाठी जर कोणता पदार्थ सर्वोत्त ठरत असेल, तर तो म्हणजे, पोहे (Pohe). नाश्त्यासाठी पोहे खाणं हे भातापेक्षा उत्तम मानलं जातं. पोहो बनवायलाही खूप सोपे आहेत. नाश्त्याला पोहे खाल्ल्यानं दिवसाला उत्तम किकस्टार्टही मिळतो. पोह्यांमध्ये आयर्न आणि कार्ब्स मोठ्या प्रमाणावर असतात, जे तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला ऊर्जा देण्यासाठी मदत करतात. तसेच, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे. तांदळात सिम्पल कार्बोहायड्रेट आढळतात, ज्यामुळे नाश्त्याला भात खाल्ल्यानं तुम्हाला थोडं सुस्त वाटू शकतं. पण पोहे खाल्ल्यानं अजिबात सुस्ती येत नाही.
पोह्यांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी
नाश्त्यात पोहे खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. पोहे तुमच्या डेली कॅलरी इनटेक बॅलेन्स राखण्यासाठी मदत करतात. जर तुम्ही पोहे तयार करताना त्यात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश केला, तर एक वाटी पोहे खाल्ल्यानं तुम्हाला अंदाजे 250 कॅलरीज मिळतात, तसेच जर तुम्ही एवढ्याच प्रमाणात फ्राईड राईस खाल्ल्या तर तुम्हाला 333 कॅलरीज मिळतात. कॅलरी संतुलन राखण्यासोबतच पोह्यांमुळे तुमचं पोट दीर्घकाळ भरल्यासारखंही वाटतं. दरम्यान, जर तुम्ही पोह्यात तळलेले शेंगदाणे घातले तर पोह्यांमधील कॅलरीजची संख्या वाढते.
मुबलक प्रमाणात आयर्न
आजकाल बहुतेक लोक आयर्नच्या कमतरतेनं त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत नाश्त्यात पोहे खाल्ल्यानं तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. जेव्हा तांदळावर प्रक्रिया करून पोहे बनवले जातात, तेव्हा त्यातील आयर्नच्या प्रमाणात मोठी वाढ होते. अशक्तपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी पोहे हा भातापेक्षा नक्कीच चांगला पर्याय आहे. जर तुम्ही ते नियमितपणे खाल्ले तर तुम्हाला कधीच लोहाची कमतरता जाणवत नाही. पोह्यांची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस घालतात, ज्यामुळे लोह शोषण्यास मदत होते.
पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत
पोहो हे भाताच्या तुलनेत पचण्यास हलके असतात. यामुळेच जेव्हा लोक नाश्त्यात भात खातात, तेव्हा त्यांना सुस्ती येते. इतकंच नाही तर भातामुळे ऊर्जा तर मिळतेच, पण काही वेळातच शरीराला थकवा जाणवतो. तर पोहे पचनास हलके असतात. पोहो तुम्ही सकाळ आणि संध्याकाळच्या नाश्त्यातही खाऊ शकता. जेव्हा तुम्ही त्यात काही भाज्या घालून तयार करता, तेव्हा तुम्हाला त्यातून अनेक प्रकारची जीवनसत्त्व आणि मिनरल्स मिळतात.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स
साध्या तांदळाच्या तुलनेत पोह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. याचा सरळ अर्थ असा की, जेव्हा तुम्ही पोहे खाता, तेव्हा त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. हळूहळू रिलीज होते, ज्यामुळे तुम्हाला सतत ऊर्जा मिळते. जे तुम्हाला दीर्घकाळ भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे, डायबिटीज रुग्णांसाठी पोहो अत्यंत फायदेशीर ठरतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Curry Leaves: सकाळी उठल्या-उठल्या प्या, कढीपत्त्याचं पाणी अन् जादू पाहा; एक नाही अनेक फायदे!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)