छोट्याशा वेलचीचे मोठे फायदे... अनेक गोष्टींवर उपायकारक
Health Benefits Of Cardamom : आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्यांचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असतात. यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेलची किंवा इलायची.
Health Benefits Of Cardamom : आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्यांचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असतात. यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेलची किंवा इलायची. चहाची चव वाढावी किंवा माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर केला जातो. पण या छोट्याशा वेलचीचे तसे बरेच फायदे आहेत. छोट्या दिसणाऱ्या वेलची मोठे फायदे जाणून घेऊयात...
पचनासंबंधी समस्या असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. त्यामुळेच जेवणानंतर वेलची खाण्यासाठी दिली जाते. त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो. तसंच अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे. वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो.
याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेलचीच्या सेवनानं सेक्स लाइफमध्ये सुधारणा होऊ शकते. वेलचीमुळे शरीरात उर्जा प्राप्त होते. त्यामुळेच वेलची सेवन करणं चांगलं मानलं जातं.
वेलचीमध्ये आवश्यक घटक असल्यानं त्यामुळे नपुंसकता, इरेक्टारइल डिस्फंक्शन और इंफर्टिलिटी यासारख्या समस्यांवर मात केली जाऊ शकते. वेलचीमध्ये आर्यन, व्हिटामिन सी, रिबोफ्लोविन आणि नियासिन यासारखे पोषक द्रव्य यात असतात. तसेच वेलचीच्या सेवनानं अॅनिमियापासूनही संरक्षण होतं.
घसा दुखणं किंवा खवखव असल्यास वेलचीच्या सेवनानं नक्कीच आराम मिळतो. तसंच वेलचीच्या सेवनानं रक्ताची असणारी कमतरताही दूर होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
- Hair Care Tips : हिवाळ्यात कशी घ्याल केसांची काळजी; वापरा 'हे' हेअर मास्क
- Weight Loss Juice Recipe : झटपट वजन कमी करायचंय? काकडी-कोथिंबीरीचा ज्यूस ठरतो फायदेशीर
- Merry Christmas 2021 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )