एक्स्प्लोर

'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती

मनसे नेते अविनाश जाधव यांचा मला फोन आला होता, राज ठाकरे यांनी महापालिकेत बिनविरोध आलेल्या उमेदवारांबाबत नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणुकानंतर आता महापालिका (Election) निवडणुकांमध्येही बिनविरोधचे वारे वाहिले असून भाजप-शिवसेना महायुतीच्या तब्बल 70 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निवडीनंतर विरोधकांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे. ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS) यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतील बिनविरोध निवडणुका ह्या धमक्या, पैशाचे आमिष देऊन करण्यात आल्याचे आरोप करत काही पुरावेही दिले आहेत. त्यानंतर, जाधव यांनी पुण्यातील विधिज्ञ अॅड. असीम सरोदे (Asim sarode) यांच्याशी फोनवरुन यासंदर्भात चर्चा केल्याचे स्वत: सरोदे यांनी सांगितले. तसेच, महापालिका निवडणुकांतील बिनविरोधप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मनसे नेते अविनाश जाधव यांचा मला फोन आला होता, राज ठाकरे यांनी महापालिकेत बिनविरोध आलेल्या उमेदवारांबाबत नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायालयातून याबद्दल तोडगा काढला पाहिजे, 68 ते 70 जागा राज्यातून बिनविरोध झाल्या आहेत. 50 जागा भाजप, 20 जागा शिंदे यांच्या आणि काही इतरही आहेत. महाराष्ट्राला या नवीन वर्षात राजकीय भ्रष्ट गिफ्ट मिळालं आहे. राज्य निवडणूक आयोगानेसुद्धा आता अशा जागांची चौकशी करायला सुरुवात केली आहे. मात्र, निवडणूक आयोग बायस आहे, ते सत्ताधारी पक्षाकडून बोलतात असं अविनाश जाधव यांनी सांगितलं, असे असीम सरोदे म्हणाले.

स्थानिक पातळीवर, स्थानिक नेत्यांनी, स्थानिक विषयांना धरून निवडणूक लढवली पाहिजे. पण, स्थानिक हा शब्द त्यातून वगळला आहे. सोलापूरमधील मनसेचे नेते बाळासाहेब सरवदे यांचाही बिनविरोध, अर्ज माघारी घेण्यावरुन खून झाला आहे. त्यामुळे, निवडणूक आयोगाच्या आख्यारीत हा विषय न ठेवता उच्च न्यायालयात हा विषय गेला पाहिजे. महाराष्ट्रात नगरसेवकांची खरेदी-विक्री यार झाल असून भ्रष्ट मार्गातून या निवडणुका होत आहेत का? असा सवाल सरोदे यांनी विचारला आहे. तर, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली गेली आहे, 16 तारखेपूर्वी म्हणजे निवडणूक निकालापूर्वी ही याचिका बोर्डावर आली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कारण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर जाताना एक उमेदवार दिसतो, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून असे अनेक व्हिडि आहेत, त्याचे काही पुरावे ठेवले जात नाहीत. पैशांचा वापर होतो, गुन्हेगारी वापरली जाते आहे. पुण्यातील 2 बिनविरोध झालेल्या उमेदवारांच्या नावानेसुद्धा काँग्रेसचे समीर गांधी यांनी कोर्टात धाव घेतली आहे, अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली.

बिनविरोध संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही

दरम्यान, बिनविरोध निवडणुकीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे समीर गांधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांना पैसे देऊन आणि दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला भाग पडल्याचा दावा याचिकेत करण्यात आला. बिनविरोध संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही, असेही याचिकेत म्हटले. लोकप्रतिनिधी कायद्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी असा स्पष्ट उल्लेख असून बिनविरोध विजयी उमेदवारांना पडलेल्या मतांची किमान टक्केवारी निश्चित करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणावर बोट ठेवत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच सवाल उपस्थित करण्यात आले. निवडणूक आयोग राज्यसरकारच्या दबावाखाली आहे, उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडणुकीचे निकाल जाहीर न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्याची मागणी याचिकेत केली आहे.

हेही वाचा

महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget