(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weight Loss Juice Recipe : झटपट वजन कमी करायचंय? काकडी-कोथिंबीरीचा ज्यूस ठरतो फायदेशीर
हिवाळ्यात (Winter) अनेकांचे वजन वाढते. थंडीत जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर काकडी आणि कोथिंबीरीचा हा ज्यूस नक्की प्या.
Weight Loss Juice Recipe : हिवाळ्यात (Winter) अनेकांचे वजन वाढते. थंडीत जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर काकडी आणि कोथिंबीरीचा हा ज्यूस नक्की प्या. या ज्युसमुळे वेट लॉस होतो. हिवाळ्यात जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत (Weight Loss Juice Recipe) -
हा ज्यूस काकडी कोथिंबीर आणि कोरफडचा वापर करून तयार केला जातो. जाणून घेऊयात ज्यूस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य-
एक काकडी
एक वाटी कोथिंबीरीची पानं
आल्याचा रस 1 चमचा
पाणी आर्धा ग्लास
काकडी आणि कोथिंबीरचे ज्यूस तयार करण्याची पद्धत (Cucumber And Coriander Leaf Juice Recipe)-
1. काकडी किसून घ्या.
2. किसलेली काकडी, कोथिंबीरची पानं, कोरफड आणि आलं मिक्सरमधून मिक्स करून घ्या.
3. हा ज्यूस गाळणीतून गाळून घ्या.
4. तयार झालेल्या ज्यूसमध्ये लिंबाचा रस मिक्स करा.
आठवड्यातून दोन वेळा हा ज्यूस प्यायल्याने काही दिवसांमध्ये तुमचे वजन कमी होईल.
गरम पाणी प्या- वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल. गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते. आयुर्वेदात असेही म्हटले आहे की सकाळी 2 कप कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उर्जा निर्माण होते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने वजन झटपट कमी होते.
हेल्दी ब्रेकफास्ट खा- रोज साकळी ब्रेकफास्टमध्ये अंडे, दूध, ड्रायफ्रूट्स, स्प्राउट्स, ब्राउन ब्रेड, शेक, स्मूदीज इत्यादींचा समावेश करावा. तसेच ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन आणि फाइबर यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Health Tips : दररोज दूधात तूप टाकून प्या, पळून जातील आजार; काय आहेत फायदे?
Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )