Merry Christmas 2021 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण
Merry Christmas 2021 : नाताळच्या शुभेच्छा देताना 'मेरी ख्रिसमस' का बोलतात याचं कारण जाणून घ्या...
Merry Christmas 2021 : डिसेंबर (December) महिना आला की जगभरात 'मेरी ख्रिसमस'चे (Merry Christmas) बोल कानावर पडू लागतात. 'मेरी ख्रिसमस' म्हणत लोक एकमेकांना नातळ सणाच्या शुभेच्छा देतात. तसे भेटकार्डही वाटले जातात. मात्र 'मेरी ख्रिसमस' का बोललं जातं याचं कारण तुम्हांला माहित आहे का? तुम्हांला कधी असा प्रश्न पडला आहे की, दिवाळी, होळी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपण 'हॅपी न्यू इयर', 'हॅपी होली' किंवा 'हॅपी दिवाली' असे म्हणतो मात्र ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना 'मेरी ख्रिसमस' बोललं जातं. आज या मागचं कारण जाणून घ्या...
'मेरी' आणि 'हॅपी' शब्दामधील फरक काय?
युरोपात 18व्या आणि 19व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलून दिल्या जायच्या. इंग्लंडमध्ये तर आजही अनेक लोक नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलूनच दिल्या जातात. याशिवाय याशिवाय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनीही 'हॅप्पी ख्रिसमस' हा शब्द वापरला होता. 'हॅपी' आणि 'मेरी' या दोन्ही शब्दांचा अर्थ आनंद असा सारखाच आहे. मात्र, सध्या 'मेरी' हा शब्द अधिक प्रचलित आहे.
प्रसिद्ध साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी 'मेरी' शब्द प्रचलित केला
'मेरी' हा शब्द प्रसिद्ध होण्यामागे साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांची मोठी भूमिका मानली जाते. आजपासून सुमारे 175 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'अ ख्रिसमस कॅरोल' या पुस्तकात 'मेरी' हा शब्द सर्वाधिक वापरण्यात आला होता. यानंतर हे पुस्तक जगभर वाचले गेले आणि त्यानंतर 'हॅप्पी'च्या जागी 'मेरी' शब्दाची प्रथा सुरू झाली. मात्र, तुम्ही 'मेरी ख्रिसमस' ऐवजी 'हॅपी ख्रिसमस' म्हणत जरी नाताळच्या शुभेच्छा दिल्या, तर त्यात काहीही गैर नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- Health Care Tips : आरोग्यदायी गुळाची चिक्की, जाणून घ्या फायदे...
- The Kapil Sharma Show : 'मुंबईत राहतो आणि मराठी बोलत नाही'; सोनालीने कपिलला सुनावलं
- जीन्सवर ही छोटी बटणं का असतात? माहितीय का...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha