Good Health Care Tips : जेवणात हळद जास्त घातल्याने आरोग्यास हानी होऊ शकते, जाणून घ्या
Health Care Tips : हळदीचे सेवन केल्याचे जसे फायदे होतात तसेच त्याचे तोटेदेखील आहेत.
Turmeric Side Effects : हळदीचे सेवन केल्याचे जसे फायदे होतात तसेच त्याचे तोटेदेखील आहेत. तर दुसरीकडे हळदीचा वापर लग्नापूर्वी किंवा पूजा करताना धार्मिक कार्यासाठी केला जातो. हळद त्वचेचीदेखील काळजी घेत असते. हळदीच्या सेवनामुळे आरोग्याची हानी होत असते.
हळदीचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे
हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म आजारांपासून वाचवण्याचे काम करतात. पण याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. दुसरीकडे जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. चक्कर येण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हळद एक चमच्यापेक्षा जास्त खाऊ नये.
हळदीचे अती प्रमाणात सेवन केल्याने या समस्या उद्धवू शकतात
स्टोनची समस्या - हळदीचे जास्त सेवन केल्याने स्टोनची समस्या निर्माण होऊ शकते. कारण हळदीमध्ये ऑक्सलेट असते. हे ऑक्सलेट शरीरात विरघळण्याऐवजी कॅल्शियमशी जोडले जाते.त्यामुळे कॅल्शियम अविद्राव्य होऊ लागते. त्यामुळे ते दगडाचे रूप घेते.
उलट्यांची समस्या - हळदीमध्ये अनेक घटक आढळतात. त्यापैकी एक कर्क्यूमिन आहे. या कर्क्युमिनमुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनेक वेळा उलट्यांचा त्रासही होऊ लागतो. पण ही समस्या तेव्हाच उद्भवते जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात हळदीचे सेवन करता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Winter Health Care: थंडीत 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे
Skin Care Tips for Winter : हिवाळ्यात त्वचा होते कोरडी, अशी घ्या काळजी; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Good Health Care Tips : ग्लोइंग अन् हेल्दी स्किन हवीये? घरच्या घरी करा फेशिअल, 'या' स्टेप्स फॉलो करा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )