एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं

Saif Ali Khan Attack: सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमधून अटक, नामांकित बांधकाम कंपनीचा कामगार असल्याची धक्कादायक माहिती.

ठाणे: अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील घरात जीवघेणा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद  आलियान असे या हल्लेखोराचे नाव असून तो ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात लपून  बसला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस आणि कासारवडवली पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत शनिवारी रात्री पावणेतीनच्या सुमारास मोहम्मद आलियानच्या मुसक्या आवळल्या. मोहम्मद आलियान याला आता खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तिथून मोहम्मदला वांद्रे येथे सुट्टीकालीन न्यायालयात नेले जाईल. हे मुंबई पोलिसांच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे. थोड्याचवेळात मुंबई पोलीस यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. 

मोहम्मद आलियान याचा चेहरा सैफ अली खानच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी बराच मिळताजुळता आहे. मोहम्मद अलियान हा कोणालाही संशय येऊ नये म्हणून ठाण्यात नाव बदलून राहत होता. तो विजय दास या नावाने ठाण्यातील एका बारमध्ये हाऊस किपिंगचे काम करत होता. त्याचा मुक्काम हिरानंदानी इस्टेटपासून काही अंतरावर असणाऱ्या एका लेबर कॅम्पमध्ये होता. कामगारांच्या या वस्तीमध्ये मोहम्मद आलियान वेष पालटून राहत होता. मुंबई पोलिसांना त्याच्याबाबत शनिवारी रात्री माहिती मिळाली आणि त्यानंतर तातडीने मोहम्मद आलियानच्या मुसक्या आवळण्यासाठी कोव्हर्ट ऑपरेशन राबवण्यात आले.

रात्रीच्या अंधारात मोबाईल टॉर्च घेऊन पोलिसांचं सर्च ऑपरेशन

मुंबई पोलिसांनी मोहम्मद आलियान कासारवडवली येथील लेबर कॅम्पमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कासारवडवली पोलिसांना कळवून मोहम्मदला शोधण्यासाठी मोहीम सुरु केली. मात्र, पोलीस आपल्याला पकडण्यासाठी लेबर कॅम्पमध्ये येत आहेत, याची कुणकुण मोहम्मदला अगोदरच लागली. पोलिसांना चकवण्यासाठी मोहम्मद आलियान लेबर कॅम्पपासून काही अंतरावर असलेल्या जंगलात शिरला. 

मुंबई पोलीस आणि कासारवडवली पोलिसांची पथके रात्री 2 वाजता लेबर कॅम्पच्या परिसरात पोहोचली. मात्र, मोहम्मद आलियान अगोदरच जंगलात पळून गेला होता. त्यामुळे पोलिसही त्याला शोधण्यासाठी पुरेशी साधनं उपलब्ध नसताना जंगलात शिरले. पोलिसांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात मोहम्मद आलियानचा शोध सुरु केला. पोलिसांच्या पथकाने जंगलाच्या परिसराला घेराव घातला. अखेर पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर मोहम्मद आलियान पहाटे पावणेतीनच्या सुमारास पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तातडीने मुंबई आणले.

मोहम्मद आलियानकडून कबुली

मोहम्मद आलियानला ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. तेव्हा त्याने आपण सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरल्याची प्राथमिक कबुली दिली. मोहम्मद आलियान हा बांगलादेशी घुसखोर असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. मात्र, तो एका नामांकित कंपनीत कंत्राटी तत्त्वावरील कामगार होता. सैफ अली खानवर हल्ला करुन परतल्यानंतर त्याने लूक बदलला होतो. तो लेबर कॅम्पमधील काही लोकांना पोलीस इकडे आले होते का, असे विचारत होता. यामुळे काही कामगारांना त्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा

जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानवर 'लीलावती'मध्ये उपचार, रुग्णालयाचं बिल 35 लाख, इन्शुरन्स क्लेमचा आकडा समोर; 'या' दिवशी मिळणार डिस्चार्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget