(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Good Health Care Tips : ग्लोइंग अन् हेल्दी स्किन हवीये? घरच्या घरी करा फेशिअल, 'या' स्टेप्स फॉलो करा
फेशियल करण्यासाठी अनेक जण पार्लरमध्ये जातात. फेशियल हे स्किनच्या प्रकारानुसार केले जाते. फेशियलने स्किनवर तेज येते.
Facial Massage at Home : फेशियल करण्यासाठी अनेक जण पार्लरमध्ये जातात. फेशियल हे स्किनच्या प्रकारानुसार केले जाते. फेशियलने स्किनवर तेज येते. तसेच चेहरा स्वच्छ होतो. 30 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी महिन्यातून एकदा फेशियल करावे. फेशियलचे गोल्ड फेशियल, फ्रुट फेशियल असे अनेक प्रकार आहेत. फेशियल केल्याने स्किनवरील टॅन कमी होतो. जर तुम्हाला घरच्या घरी फेशियल करायचं असेल तर या स्टेप्स फॉलो करा
1. तुमच्या बोटांना भूवयांजवळ ठेवा. आता हळू हळू बोट गोलाकार कपाळावर फिरवत मसाज करा. कमीत कमी पाच मिनीट हा मसाज करावा.
2. कपाळावर मसाज करून झाल्यानंतर डोळ्यांचा मसाज करावा. डोळ्यांच्या भागात अंगठ्याने मसाज केल्याने डार्क सर्कल्स कमी होतात.
3. त्यानंतर गालांवर आणि हनुवटीवर बोटांनी हळूवारपणे मसाज करावा.
Health Care Tips : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवतील 'या' गोष्टी; फक्त आहारात थोडे बदल करा
घरच्या घरी ट्राय करा फेशियल योगा
फेशियल योगा हा चेहऱ्याचा मसाज आणि व्यायमाचा प्राकार आहे. हा योगा केल्याने चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचा उत्तेजित होते. तसेच या योगाने तणाव आणि चिंता कमी होतात.चेहऱ्याचे स्नायू मऊ देखील होतात. काही संशोधनामधून असे स्पष्ट झाले आहे की, फेशियल योगामुळे त्वाचा उजळ होते. फेशियल योगाचे अनेक मानसिक आणि शारिरीक फायदे आहेत.
फेशियल केल्यानंतर 'या' गोष्टी टाळा
उन्हामध्ये जाणे टाळावे- फेशियल केल्यानंतर लगेच जर तुम्ही उन्हामध्ये गेलात तर तुमच्या चेहऱ्यावर रिअॅक्शन्स येऊ शकतात. त्यामुळे फेशियल केल्यानंतर लगेच उन्हामध्ये जाणे टाळावे.
थ्रेडींग करू नये - फेशियल केल्यानंतर लगेच थ्रेडींग करू नये. कारण फेशियलनंतर लगेच थ्रेडींग केल्याने दोऱ्याचे कट्स लागू शकतात. त्यामुळे फेशियल करण्याआधी थ्रेडींग करावे.
फेस मास्क लावू नये- फेशियल केल्यानंतर एक अठवडा फेम मास्क लावू नये. फेस मास्क लावल्याने स्किनवरील ग्लो कमी होऊ शकतो.