Hypertension Control : या 4 गोष्टींचा वापर केल्याने हायपरटेन्शन आणि ब्लडप्रेशरची समस्या होईल दूर; वाचा माहिती
Diet For High Blood Pressure Control : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने आहारात या 4 गोष्टींचा समावेश करावा.
![Hypertension Control : या 4 गोष्टींचा वापर केल्याने हायपरटेन्शन आणि ब्लडप्रेशरची समस्या होईल दूर; वाचा माहिती food for hypertension and blood pressure control what is the fastest way to lower blood pressure naturally marathi news Hypertension Control : या 4 गोष्टींचा वापर केल्याने हायपरटेन्शन आणि ब्लडप्रेशरची समस्या होईल दूर; वाचा माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/08/d003aec1f3e61e5b89d14a867083c885_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Food For Hypertension Control : शरीरातील रक्तदाब वाढला की अनेक समस्या उद्भवू लागतात. रक्तदाब वाढल्यामुळे छातीत दुखणे, डोकेदुखी, दृष्टी कमी होणे आणि दिवसभर आळस आणि सुस्तपणा जाणवतो. एवढेच नाही तर रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो. भारतात उच्च रक्तदाब आणि उच्चरक्तदाबाच्या वाढत्या घटनांमागील एक प्रमुख कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली. एका अभ्यासानुसार भारतात दर 3 पैकी 1 व्यक्ती रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहे. ब्लड प्रेशर आणि मधुमेह हे असे आजार आहेत जे फक्त औषधे आणि आहाराने नियंत्रित करता येतात. त्यांच्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने आहारात या 4 गोष्टींचा समावेश करावा.
1. हिरव्या भाज्या : रक्तदाबाच्या रुग्णांनी आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. पालेभाज्या जसे की पालक, आणि लेट्युससारख्या हिरव्या भाज्या खाव्यात. त्यामुळे शरीराला भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. पोटॅशियम मूत्रपिंडांना अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास मदत करते.
2. केळी : उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने जेवणात केळीचा अवश्य समावेश करावा. केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तुम्ही दिवसातून एक केळं नक्की खायला हवं.
3. बीट : रक्तदाबाच्या रुग्णाने बीट जरूर खावे. बीटरूटमध्ये नायट्रिक ऑक्साईड जास्त असते, ज्यामुळे रक्तवाहिन्या उघडतात आणि प्रवाह सुधारतो. बीटरूट तुम्ही सॅलड किंवा भाजी म्हणून खाऊ शकता.
4. लसूण : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी लसूण रामबाण उपाय आहे. लसूण खाणे आवश्यक आहे. लसणामध्ये अँटी बायोटिक आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. हे स्नायूंना आराम देतात आणि सर्व ठिकाणी रक्त वाहून नेण्यास मदत करतात. लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात वाढ होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Diabetes : वडिलांचा मधुमेह 'असा' दूर करा, सोप्या टिप्स वाचा सविस्तर
- Kidney Problem : किडनी निकामी झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं; तुमची किडनी निरोगी आहे की नाही? जाणून घ्या
- Home Remedies For Piles: मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)