Kidney Problem : किडनी निकामी झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं; तुमची किडनी निरोगी आहे की नाही? जाणून घ्या
किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्ही किडनीच्या आजाराची लक्षणे आणि उपचारांवर वेळीच लक्ष दिले पाहिजे.
![Kidney Problem : किडनी निकामी झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं; तुमची किडनी निरोगी आहे की नाही? जाणून घ्या how to keep your kidney healthy kidney problem early symptoms treatment food marathi news Kidney Problem : किडनी निकामी झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं; तुमची किडनी निरोगी आहे की नाही? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/04/1d6662dc86caa3dd3c177f6fb25469ff_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kidney Problem : आपल्या शरीरात 2 किडनी असतात, जे रक्त स्वच्छ करण्याचे म्हणजेच विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. किडनीमध्ये काही समस्या असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. सर्वात मोठी समस्या ही आहे की, मूत्रपिंडाचा आजार किंवा बिघाड अनेकदा खूप उशिरा आढळतो. जगभरातील लाखो लोक विविध प्रकारच्या किडनी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत. म्हणूनच किडनीच्या आजाराला 'सायलेंट किलर' म्हणतात. अनेक वेळा लोकांना किडनी निकामी होण्याची लक्षणे समजत नाहीत आणि काही लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. किडनीमध्ये समस्या असल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊयात.
किडनीच्या त्रासाची लक्षणे
- मूत्रपिंडात काही समस्या असल्यास, प्रथम लक्षणे तुमच्या घोट्या, पाय आणि टाचांवर दिसतात. तुमच्या या भागांवर सूज येऊ लागते.
- जेव्हा मूत्रपिंडात समस्या असते तेव्हा सूज येण्याची तक्रार असते. त्यामुळे डोळ्यांभोवती सूज येते.
- तुम्हाला सुरुवातीला खूप अशक्तपणा आणि थकवा येतो. अधिक काम करणे कठीण होते.
- मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे भूकेवरही परिणाम होतो. यामुळे भूक कमी होते आणि चव बदलते.
- मूत्रपिंड निकामी होण्याच्या लक्षणांमध्ये सकाळी मळमळ होणे आणि उलट्या होणे यांचा समावेश होतो. सकाळी दात घासताना असे होऊ शकते.
अशा प्रकारे किडनी निरोगी ठेवा
- किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे मूत्रपिंड शरीरातून सोडियम, युरिया आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते.
- किडनी निरोगी ठेवण्यासाठी मीठयुक्त अन्न कमी खावे. यासाठी पॅकेज केलेले आणि रेस्टॉरंटचे अन्न टाळावे.
- किडनी निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घ्या आणि वजन नियंत्रित करा.
- तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी वेळोवेळी तपासत राहा.
- तळलेले आणि गोड पदार्थांपासून दूर राहा आणि भरपूर फळे आणि भाज्या खा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Home Remedies For Piles: मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..
- Health Tips : यकृतासाठी या 5 गोष्टी आहेत वरदान; रक्तही होईल स्वच्छ
- Singer KK Death : हृदयविकाराचा झटका येण्याआधी केके यांना जाणवली होती 'ही' लक्षणं; या 7 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)