Shrikant Shinde : मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 78 नवोदित आमदारांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीने 233 जागा जिंकल्या असून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ 49 जागांवर विजय मिळवता आला. यंदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 78 आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे 10, शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेसच्या 6 आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 78 नवोदित आमदारांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीतील नवोदित आमदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी जेवणासाठी उपस्थित राहणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील पाच वर्षात महाराष्ट्रात अनेक राजकीय भूकंप घडले. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे दोन मोठे पक्ष फुटले. आधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मदतीने भाजपने सरकार बनवले. नंतर अजित पवार (Ajit Pawar) हे देखील सरकारमध्ये सहभागी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने यांच्या महाविकास आघाडीत लढत झाली. या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल इतक्याही जागा जिंकता आलेल्या नाहीत.
दिल्लीत श्रीकांत शिंदेंची डिनर डिप्लोमसी
तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या नवोदित आमदारांना शिंदेंच्या घरी जेवणाचे निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा 78 आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. विधीमंडळ सचिवालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी ७८ आमदार दाखल झाले असून ठाकरेंचे आणि पवारांचे आमदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी जेवणासाठी जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; शिवतीर्थावरील भेटीने चर्चेला उधाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

