एक्स्प्लोर

संगणकासमोर सतत काम केल्याने डोळ्यांवर ताण येणे व दृष्टीदोषाच्या समस्या : रिसर्च

कामानिमित्त संगणक व मोबाईलकडे पाहण्याचा कालावधी वाढल्याने डोळ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. यामध्ये डोळे थकणे व डोकेदुखी येथपासून डोळे कोरडे पडणे, अस्पष्ट दृष्टी, दुहेरी दृष्टी, डोळे खाजणे, डोळ्यांत सतत पाणी येणे अशा काही जटील समस्यांचा समावेश आहे.

मुंबई : ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ (सीव्हीएस) रोखण्यासाठी कामाच्या ठिकाणी असलेल्या अर्गोनॉमिक जोखीम घटकांची सविस्तर माहिती देणारा ‘व्हिज्युअल अर्गोनॉमिक्स’ या नावाचा एक अनन्य स्वरुपाचा नवीन संशोधन अहवाल ‘गोदरेज इंटिरिओ’ या भारतातील आघाडीच्या फर्निचर सोल्यूशन्स ब्रँडतर्फे सादर करण्यात आला. 500 हून अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण करून ही माहिती संकलित करण्यात आली व तिच्या विश्लेषणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या विश्लेषणात संबंधित व्यक्तींच्या कामाचे स्वरूप, त्यांच्या ‘गॅझेट’च्या वापराचा कल आणि त्यांच्या शरीराची ठेवण या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे.

कामावर व घरी संगणक किंवा मोबाईल फोनच्या डिजिटल स्क्रीनचा वापर करण्याचे प्रमाण वाढल्याने गेल्या काही वर्षांत दृष्टीदोषाचे प्रमाणही वाढत चालले आहे. संगणक व मोबाईलकडे पाहण्याचा कालावधी वाढल्याने डोळ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. यामध्ये डोळे थकणे व डोकेदुखी येथपासून डोळे कोरडे पडणे, अस्पष्ट दृष्टी, दुहेरी दृष्टी, डोळे खाजणे, डोळ्यांत सतत पाणी येणे अशा काही जटील समस्यांचा समावेश आहे.

दृष्टीसंबंधी बहुतांश समस्यांच्या वैज्ञानिक कारणांचा सखोल शोध या अभ्यासात घेण्यात आला आहे. या प्रत्येक कारणाचे स्पष्टीकरणही यात देण्यात आले आहे. यातून, ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या डोळ्यांची चांगली काळजी कशी घ्यावी व डोळ्यांची योग्य ती स्वच्छता कशी ठेवावी, हे समजण्यास मदत होते. नुकत्याच सादर झालेल्या एका अभ्यासानुसार, कार्यालयीन कर्मचारी दिवसाकाठी किमान 6 तास संगणकाच्या स्क्रीनकडे पाहात असतात. 65 टक्के जणांमध्ये डोळ्यांवर ताण येणे व दृष्टीदोष या समस्या असल्याचे आढळून आले, तर 47 जणांना डोकेदुखी व थकवा हे त्रास होत असल्याचे त्यामध्ये नोंदण्यात आले. भारतीय नागरिक स्क्रीनकडे अति प्रमाणात पाहात असतात, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. 70 टक्के कर्मचारी दिवसातील 6 ते 9 तास आपल्या गॅझेट्सच्या स्क्रीनकडे पाहात असतात, असे त्यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, भारतीय कार्यालयांमध्ये 68 टक्के ‘वर्कस्टेशन्स’मधील संगणकांच्या स्क्रीनमधून येणारा उजेड हा अयोग्य असतो. त्यांतील 58 टक्के स्क्रीनमधील उजेड अपुरा आणि 42 टक्के स्क्रीनमधील उजेड खूपच जास्त अशा प्रमाणात असतो, असे दिसून आले आहे.

प्रिंट झालेला, हाताने लिहिलेला किंवा संगणकाच्या स्क्रीनवर उमटलेला मजकूर वाचण्यासाठी योग्य स्वरुपात उजेड हवा असतो; जेणेकरून मजकूर नीट दिसू शकेल. खोलीत अति उजेड असेल किंवा अगदी कमी प्रकाश देणारी व्यवस्था असेल, मोठ्या आकाराच्या, उघड्या खिडक्या असतील किंवा छतावर लावलेली प्रकाश व्यवस्था असेल, तर डिजिटल स्क्रीनवरील मजकूर दिसण्यात अडचण येते.

संगणकाचा मॉनिटर ठेवण्याची पद्धत

वर्कस्टेशनचे अर्गोनॉमिक्स हे देखील ‘सीव्हीएस’ निर्माण होण्याचे कारण असते. मॉनिटर चुकीच्या पद्धतीने ठेवलेला असेल, तर मानेची ठेवण बदलते आणि त्यातून मान, पाठीचा वरचा भाग व खांदा यांची दुखणी सुरू होतात. गॅझेटच्या स्क्रीनकडे बराच वेळ पाहात राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर व स्वास्थ्यावर शारिरीक व मानसिक स्वरुपाचा परिणाम होतो.

कार्यालयांमध्ये संगणक सतत वापरणाऱ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य नीट राखण्यासाठी, व्यापक स्वरुपाची कर्मचारी स्वास्थ्य मार्गदर्शक तत्वे आखणे गरजेचे आहे. कार्यालयांमध्ये काम करीत असताना कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना आराम मिळावा, या दृष्टीने मूल्यांकन, सुधारणा व प्रतिबंध असे मार्ग ‘गोदरेज इंटिरिओ’मधील ‘वर्कस्पेस व अर्गोनॉमिक्स संशोधन विभागा’ने सुचविले आहेत. यामध्ये डोळ्यांचे साधे व्यायाम, ‘वर्कस्पेस’मधील प्रकाश व्यवस्थेत बदल करून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीच्या स्थितीचे नियमित मूल्यांकन व विश्लेषण हे सुचविण्यात आले आहे.

• अर्गोनॉमिक मूल्यांकन – ‘वर्कप्लेस अर्गोनॉमिक्स’चे मूल्यांकन करून संगणकाचे काम व वर्कस्टेशन्स यांच्यासाठी शिफारसी करणे. • कर्मचाऱ्यांची दृष्टी तपासणी – संगणक वापरणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या दृष्टीची तपासणी कार्यालयामध्ये नियमितपणे करून घेणे अनिवार्य असणे. • ‘सीव्हीसी’ची वार्षिक तपासणी – कर्मचाऱ्यांच्या ‘सीव्हीसी’ची नियमित तपासणी आवश्यक आहे. संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करतेवेळी डोळ्यांचेही आरोग्य तपासले जात असेल, तर ही ‘सीव्हीसी’ची तपासणीही त्यात करून घेता येईल.

‘अर्गोनॉमिक्स’विषयक समस्या सोडविण्याकरीता जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. योग्य सवयींविषयी प्रशिक्षण देणे, ‘वर्कस्टेशन्स’ची व्यवस्था सुधारणे आणि कामाच्या अनुषंगाने डिजिटल स्वच्छता राखणे या गोष्टीही केल्या पाहिजेत. त्याचबरोबर, शारिरीक व मानसिक ताण कमी करून फिटनेस कसा मिळवायचा, याचे प्रशिक्षण दिल्यास, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर येणारा ताण व थकवा दूर करता येईल.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाहीSaleel Deshmukh :  हा रडीचा डाव; षडयंत्र रचणारा कोण आहे ? हे जनतेला माहित आहे - देशमुखDevendra Fadnavis on Chandiwal : मविआ काळातील भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे समोर आले - फडणवीसTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Laxman Hake: देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्रीपदाला विरोध का? एकवेळ भाजपला मतदान करु, पण तुतारीला नाही: लक्ष्मण हाके
ओबीसी समाज लोकसभेचा बदला घेणार, विधानसभेला तुतारीचे सर्व उमेदवार आडवे करणार: लक्ष्मण हाके
Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
Embed widget