Corona Vaccine : कोविड-19 लसीमुळे कोरोनापासून किती काळापर्यंत सुरक्षित राहता येतं?
जगभरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक कंपन्यांनी कोरोनावरील प्रभावी लसी तयार केलेल्या आहेत. परंतु, या लसींसदर्भातही लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्न म्हणजे, कोरोना वॅक्सिन घेतल्यानंतर किती काळापर्यंत आपलं या जीवघेण्या व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं? किंवा कोरोनावर ही लस किती कालावधीपर्यंत प्रभावी ठरते?
Corona Vaccine : जीवघेण्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीला धरलं आहे. जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला एका वर्षाहून अधिक काळ लोटला असून अनेक देश अद्यापही कोरोना संकटाचा सामना करत आहेत. भारतातही कोरोना व्हायरसं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही ताण आला असून देशातील अनेक राज्यांत ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना यामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशातच जगभरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक कंपन्यांनी कोरोनावरील प्रभावी लसी तयार केलेल्या आहेत. परंतु, या लसींसदर्भातही लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्न म्हणजे, कोरोना वॅक्सिन घेतल्यानंतर किती काळापर्यंत आपलं या जीवघेण्या व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं? किंवा कोरोनावर ही लस किती कालावधीपर्यंत प्रभावी ठरते?
लस घेतल्यानंतर कोरोनाचा कितपत संसर्ग होऊ शकतो?
लस घेतल्यानंतर कोरोनापासून कितपत बचाव होऊ शकतो, यावर अद्याप संशोधन सुरु आहे. आतापर्यंत लस घेतलेल्या लोकांवर संशोधन करण्यात येत असून त्यांच्या शरीरचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी किती काळापर्यंत लस प्रभावी ठरते यासाठी निरीक्षणं नोंदवली जात आहेत. तसेच या लसी कोरोनाच्या नव्या म्युटेशन्सवर कशा पद्धतीनं काम करतात, यावरही संशोधन सुरु आहे. वॉशिग्टन युनिवर्सिटीतील लस संशोधक डेबोरा फुलर यांनी सांगितलं की, "आमच्याकडे केवळ लसीवर करण्यात आलेल्या संशोधनाची माहिती आहे. त्यामुळे लस किती प्रभावी ठरते हे जाणून घेण्यासाठी लस घेतलेल्या लोकांवर संशोधन करणं आवश्यक आहे. त्यानंतरच यासंदर्भाती प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात."
कोविड-19 वॅक्सिन किती काळापर्यंत प्रभावी ठरते?
आतापर्यंत फायझरने जारी केलेल्या निरीक्षणांमधून हे समोर आलं आहे की, कंपनीची दोन डोस असणारी लस सर्वाधिक प्रभावी म्हणजेच, कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत किंवा त्याहून थोडा अधिक काळ कोरोनापासून सुरक्षा देऊ शकते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉर्डना कंपनीची कोरोना लस दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनंतरही सर्व वयोगटातील लोकांच्या शरीरात कोरोना विरोधातील अँटिबॉडिज मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. अँटी बॉडीजसोबत व्हायरससोबत लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही तेवढीच महत्त्वाची ठरते. ज्याला बी आणि टी सेल्स म्हटलं जातं. जर भविष्यात त्यांचा त्याच व्हायरससोबत सामना झालाच तर ते सेल्स व्हायरससोबत दोन हात करण्यास सक्षम असतात. जरी आजाराला ते पूर्णपणे रोखू शकले नाहीत, तरी त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांपासून बचाव करण्यासाठी ते मदत करु शकतात. परंतु 'मेमरी' पेशी कोरोना विषाणूंसह काय भूमिका घेतात, आणि किती काळ, हे अद्याप माहित नाही.
(टीप : वरील वृत्त वाचकांपर्यंत केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन C ने परिपूर्ण 'या' फळांचं सेवन जरुर करा
- कोरोना काळात घरच्या घरी बनवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी 'ही' 3 पेय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )