एक्स्प्लोर

कोरोना काळात घरच्या घरी बनवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी 'ही' 3 पेय

दिवसभरातील कामांमुळं आलेला थकवा आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी तुम्हीही घरच्या घरी बनवू शकता, घरच्या घरी 'ही' सोपी पेय...

मुंबई : मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आलेली कोरोनाची दुसरी लाट ही अधिक घातक स्वरुपाची दिसत आहे. ठिकठिकाणी वाढती रुग्णसंख्या हा धोका स्पष्टपणे दाखवत आहे. अशा परिस्थितीमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जात आहे. काही नैसर्गिक घटांकांच्या सेवनानं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास हातभार लावला जातो. दिवसभरातील कामांमुळं आलेला थकवा आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी तुम्हीही घरच्या घरी बनवू शकता, घरच्या घरी 'ही' सोपी पेय... 

Tata Steel | सेवेत तत्पर! टाटा स्टीलकडून कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दर दिवशी 300 टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा 

हळद, आलं आणि अॅपल सायडर व्हिनेगरचं पेय- शरीरातील रोगप्रतिकाक शक्ती वाढवण्यासाठी सकाळी उठून आलं आणि त्यापासून तयार करण्यात आलेली पेय पिणं कधीही उत्तम. हळद आणि आल्यामध्ये असणारे काही गुण दिवसभर तुमच्या शरीरात असणारी रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यास मदतीची ठरतात. हे पेय बनवण्यासाठी ¼ कुटलेलं आलं, ¼ चमचा हळद, 1 चमचा अॅपल सायडर विनेगर आणि चवीनुसार मध या गोष्टींची गरज आहे. 

हे पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये आलं आणि हळद टाकून 5 ते 10 मिनिटांसाठी हे मिश्रण उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करुन हे मिश्रण गाळून घ्या. हलकंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध आणि अॅपल सायडर विनेगर मिसळून हे पेय प्या. 

ओवा, तुळस आणि काळ्या मिरीपासून बनलेलं पेय - हे पेय बनवण्यासाठी अर्धा चमचा ओवा, 5-6 तुळशीची पानं, अर्धा चमचा काळी मिरी आणि 1 चमचा मध या गोष्टींची गरज आहे. 

या पेयासाठी एक ग्लास पाणी घ्या. यामध्ये तुळशीची पानं, काळीमिरी पूड, ओवा टाकून हे मिश्रण 5 मिनिटांसाठी उकळून घ्या. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये मध मिसळून हे पेय प्या. कफची समस्या सतावत असेल तर तुम्हाला यामुळे आराम मिळेल. पोटाच्या आरोग्यासाठीसुद्धा हे पेय लाभदायक आहे. 

गुळवेल, लवंग आणि लिंबापासून बनलेलं पेय- हे पेय बनवण्यासाठी 5 लवंग, 6-7 तुळशीची पानं, 1 चमचा आलं, 1 कप गुळवेलीचा रस, 2 चमचे लिंबाचा रस आणि चवीनुसार काळं मीठ या साहित्याची गरज आहे. 

हे पेय बनवण्यासाठी 1 कप पाणी 5 मिनिटं उकळवून त्यामध्ये 1 कप गुळवेलीचा रस मिसळा. चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस त्यात मिसळा. त्याचवेळी या मिश्रणात लवंग आणि तुळशीची पानंही घाला. थोड्या वेळानं मिश्रण थंड झाल्यावर ते प्या. 

महत्त्वाच्या बातम्या

Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
Pregnancy Problems: गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...
गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...
Women Health: नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Sangli Crime News: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
MLC Election Result 2026: राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?
शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?
IND vs NZ 4th T20 : भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
Embed widget