एक्स्प्लोर

Coronavirus And New Year : कोरोनाचं सावट, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर फिरायला जात असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Coronavirus Outbreak : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी फिरायला बाहेर जात असाल तर कोरोनाच्या सावटामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

Coronavirus Outbreak : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी चीन, जपान, ब्राझील, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाचा (Coronavirus) प्रसार वेगाने वाढत आहे. सध्या आपल्याकडे सुरु झालेल्या नवीन वर्षाच्या (New Year) सेलिब्रेशनसाठी फिरायला बाहेर जात असाल तर कोरोनाच्या सावटामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

कोरोना नियमांचं पालन करा, मास्क वापरा

"चीन आणि जपानमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. फुटबॉलच्या स्पर्धेमुळे जगभरातील नागरिक नुकतेच एका ठिकाणी आले होते आणि आता परत ते त्यांच्या देशांमध्ये परतले आहेत. या माध्यमातून संसर्ग प्रसार पुन्हा वाढण्याची शक्यता जास्त आहे. भारतामध्येही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन पुन्हा सुरु करणे गरजेचे आहे. हाताची स्वच्छता आणि मास्कचा वापर यावर प्राधान्याने भर देणे आवश्यक आहे. लसीकरण झाल्यामुळे आपल्याकडे कोरोनाबाबत फारसे गांभीर्य राहिलेले नाही. परंतु आता परदेशात वाढणाऱ्या प्रसारामुळे पुन्हा सावधानता बाळगणे गरजेचे आहे, " असे नवी मुंबईच्या मेडिकव्हर रुग्णाल्याचे कन्स्लटंट फिजिशियन डॉ. मनिष पेंडसे यांनी सांगितले. 

वृद्ध आणि लहान मुलं सोबत असताना कोणती काळजी घ्यावी?

एकीकडे थंडी वाढत असताना दुसरीकडे चीनमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. 31 डिसेंबर जवळ येत असल्याने अनेक लोक सुट्ट्यांची योजना आखतात. अशावेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. याशिवाय ज्यांनी बुस्टर डोस घेतलेला नसेल त्यांनी तो लगेचच घ्यावा. हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करु नका. सहलीला जाताना सोबत वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले असल्यास शाल आणि गरम कपडे घ्या. ताप, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी, पोटासंबंधी समस्या यासारख्या आजारांवरील औषधं सोबत बाळगा. विशेषत: तुम्ही लहान मुलांसोबत प्रवास करत असाल तर काही आवश्यक औषधे सोबत ठेवा. लहान मुलांना दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर सर्दी आणि फ्लू होतो. हे टाळण्यासाठी आवश्यक औषधे सोबत ठेवण्याचा सल्ला गोरेगावच्या एसआरव्ही रुग्णालयाचे फिजिशियन कन्सल्टंट डॉ अजित शेट्टी यांनी दिला आहे.

'हे' आजार असलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करावी

ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे दिसत असतील किंवा मधुमेहासारखे दीर्घकालीन आजार असल्यास किंवा याआधी न्युमोनियासारख्या आजारांची बाधा झाल्यामुळे फुप्फुसाला त्रास झाला होता तर या व्यक्तींनी प्रवास करण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करुन घेणे महत्त्वाचे आहे. ही चाचणी अधिकृत प्रयोगशाळांमध्ये करावी. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. पार्टी करताना रेस्टॉरंट, क्लब अशा गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे. सेलिब्रेशन करताना आपण आपला जीव धोक्यात तर घालत नाही ना याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. मनिष पेंडसे यांनी सांगितले.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget